इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप मेहनत घेत आहे. अशा परिस्थितीत, लॉस एंजेलिसमध्ये त्याचे एक शूट पूर्ण करत असताना, त्याच्या नाकाला दुखापत झाली. शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने चित्रपटाच्या टीमने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. रक्तस्राव थांबवण्यासाठी अभिनेत्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागल्याचेही वृत्त आहे.
शाहरुख सध्या लॉस एंजेलिसमध्ये त्याच्या आगामी प्रोजेक्टचे शूटिंग करत होता. शूटिंगदरम्यान शाहरुखसोबत मोठा अपघात झाला. शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या नाकाला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला तात्काळ नाकाची शस्त्रक्रिया करावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी अभिनेत्याच्या टीमला कळवले की रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल. शाहरुखची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
शस्त्रक्रियेनंतर किंग खान नाकावर पट्टी बांधून विमानतळावर दिसला. शाहरुख खान आता मुंबईत परतला आहे आणि त्याच्या घरी आराम करत आहे. मात्र, आतापर्यंत शाहरुखच्या टीमने त्याच्या अपघाताबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही किंवा अभिनेत्याने अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. शाहरुखच्या तब्येतीसाठी चाहते सतत शुभेच्छा देत आहेत.
शाहरुख त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिण भारतीय चित्रपट दिग्दर्शक अॅटली कुमार करत आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. दीपिका पदुकोण देखील चित्रपटात एक छोटी भूमिका साकारणार आहे.