इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही दिवसांपासून दबंग अभिनेता सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काळवीट शिकारप्रकरणी लॉरेन्स बिष्णोई गँगने देखील सलमान खानला धमकी दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सलमान खानचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. सलमान खानने नुकतेच दुबई सर्वात सुरक्षित असल्याचं वक्तव्य केलं आहे.
सलमान खान हा कायमच चर्चेत असलेला अभिनेता आहे. त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. पण, त्यासोबतच तो अनेक वादग्रस्त गोष्टींसाठी देखील चर्चेत असतो. यामुळेच सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळत असतात. मुंबई पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीये. नुकताच त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’, हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
सलमानच्या सुरक्षेत वाढ
अभिनेता सलमान खान काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मेलद्वारे ईमेल करून सलमान खान याला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सलमान खान याला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली. मुंबई पोलिसांनी सलमान खान याला वाय प्लस सुरक्षा दिली आहे. फक्त मुंबई पोलिसच नाही तर सलमान खानला खासगी सुरक्षा देखील आहे. तर काही दिवसांपूर्वी याप्रकरणी राखी सावंत हिला देखील इशारा देण्यात आला होता. सलमान खान आणि आमच्या प्रकरणात पडून नकोस, तुझ्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. सलमान खानला सुरक्षा असली तरी आम्ही त्याला त्यातूनही मारणार असल्याचा मेल राखी हिला पाठवण्यात आला.
सलमान खान याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात तो असं म्हणतो की, भारतापेक्षा मला दुबईत अधिक सुरक्षित वाटते. भरमसाठ सुरक्षा असली तरी मला भारतात सायकलने फिरणे देखील मुश्किल झाले आहे. दुबईमधील एका कार्यक्रमात बोलताना सलमान खान याने ही मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मला कितीही धमक्या मिळाल्या तरीही मला दुबईतच सुरक्षित वाटते, असे सलमान खान सांगतो.
बंदुकीचा परवाना
सलमान खान याने गेल्या वर्षी स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना घेतला आहे. सलमान खान याने काळवीटची शिकार केल्यापासून लॉरेन्स बिश्नोई सतत त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देताना दिसत आहे. अनेकदा यावर लॉरेन्स बिश्नोई थेट बोलला आहे. बिश्नोई समाजाची माफी मागण्यासाठी देखील त्याला सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रश्न सातत्याने चिघळताना दिसतो आहे.
Bollywood Actor Salman Khan Statement on India