नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता सलमान खान बॉलीवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे, याचे केवळ भारतात नव्हे तर जगभरात चाहते आहेत असे म्हटले जाते, सध्या तो शक्यतो कोणाच्या भानगडीत पडत परंतु मागील चार वर्षांपासून लॉरेन्स बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. या गँगने सलमानच्या हत्येचा यापूर्वी चार वेळा प्रयत्न केला. लॉरेन्स गँगने गेल्या तीन महिन्यांत सलमानवर हल्ल्याचे आणखी दोन प्रयत्न केले. मात्र, ते यशस्वी होऊ शकले नाहीत. त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसच्या रस्त्यावरच मारण्याची योजना लॉरेन्स गँगने बनवली होती, अशी नवी माहिती समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी कपिल पंडित याला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान सलमानच्या हत्येच्या कट रचल्याचे उघड करून कटाची माहिती पोलिसांना सांगितली.
बॉलीवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानच्या गेल्या अनेक दिवसांपासून गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर आहे. सलमान खानला संपवण्यासाठी या गॅंगन एकदा नाही तर दोनदा प्रयत्न केले होते. पण दोन्ही वेळेला त्यांना सलमानला मारण्यात यश मिळाले नाही, अशी माहिती पंजाब पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे सिद्धू मुसेवाला हत्याकांडाआधी लॉरेन्स बिश्नोईने एकदा पुन्हा सलमान खानला मारण्यासाठी प्लॅन बी तयार केला होता. या प्लॅनमध्ये गोल्डी ब्रार, कपिल पंडित (लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर) होते, ज्याला नुकतीच भारत-नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांपैकी कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि अन्य दोन नेमबाज मुंबईतील वाजे परिसरात पनवेल येथे भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी आले होते.
विशेष म्हणजे पनवेलमध्ये सलमान खानचे फार्महाऊस आहे. त्यामुळे दबा धरुन बसलेल्या बिश्नोई गॅंगच्या सर्व शूटर्सनी फार्महाऊसच्या आजुबाजूची लपून रेकी करून ठेवली होती. सलमानचे फार्म हाऊस असल्यानेच फार्म हाऊसच्या रस्त्यावरच लॉरेन्स बिश्नोईच्या शूटर्सनी ही खोली भाड्याने घेतली आणि सुमारे दीड महिना इथेच राहिले होते. लॉरेन्स बिश्नोईच्या सर्व शूटर्सच्या त्या भाड्याच्या घरात सलमानवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारी छोटी शस्त्रं, पिस्तुलं आणि काडतुसं होती. या शूटर्सनी सर्व हत्यारं लपवून ठेवली होती.
सलमानच्या बाबत सर्व बारीक सारीक माहिती काढताना शूटर्सनी याचा देखील शोध लावला होता की, जेव्हापासून सलमान हिट अॅन्ड रन प्रकरणात अडकला आहे तेव्हापासून त्याच्या गाडीचा वेग हा कमी असतो. पनवेल मध्ये सलमान खान जेव्हा त्याच्या फार्महाऊसवर येतो तेव्हा त्याच्यासोबत अनेकदा फक्त त्याचा पर्सनल बॉडीगार्ड शेराच असतो. त्यामुळे शूटर्सने गुपचूप फार्महाऊस जवळच्या सर्व रस्त्यांची देखील रेकी करून ठेवली होती. त्यांनी अंदाजा लावला होता की, त्या रस्त्यांवर खूप खड्डे आहेत,त्यामुळे सलमान खानच्या गाडीचा वेग फार्महाऊसपर्यंत येताना त्याचा वेग कमीत कमी २५ किलोमीटर ताशी एवढाच असेल, असा अंदाज होता.
इतकेच नव्हे तर लॉरेन्स बिश्नोईच्या शूटर्सनी फार्महाऊसच्या गार्डसोबतही अभिनेत्याचा चाहता असल्याचं सांगून मैत्री करुन ठेवली होती. म्हणजे सलमान खान संदर्भात सगळी अपडेट शूटर्सना मिळू शकेल. आता समोर येत आहे की,सलमान खान त्यादरम्यान आपल्या फार्महाऊसवर दोन वेळा येऊन गेला होता. पण बिश्नोई गॅंगच्या शूटर्सचा प्लॅन त्या दोन्ही वेळेला फसला होता.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तसेच धमकीचं ते पत्र लॉरेन्स बिश्नोई गॅंगने दिलं होतं. हे पत्र सलमानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉक दरम्यान मिळालं होतं. या पत्रात लिहिलं होतं की-‘तुझे हाल देखील मुसेवालासारखेच करू’. सलमानने पोलिसांना दिलेल्या माहितीत कोणावरही शंका उपस्थित केली नव्हती. जीवे मारण्याची धमकी सलमानला मिळाल्यामुळे मात्र त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ केली गेली. एवढंच नाही तर सलमान खानला स्वतः जवळ बंदूक बाळगण्याची परवानगी देखील मिळाली आहे. अधिकृत लायसन्स आता त्याच्याकडे आहे.
धमकीविषयी जाणून घेतल्यानंतर प्रश्न उपस्थित होतो की, नेमके लॉरेन्स बिश्नोई गॅंग सलमानवर एवढे रागात का आहेत? कारण सलमान खाननं केलेली दुर्मिळ काळ्या हरणाची शिकार. कारण लॉरेन्स हा बिश्नोई समाजातून आहे. त्यामुळेच सलमान खान जेव्हा काळ्या हरण्याची हत्या केल्या प्रकरणात दोषी आढळला तेव्हा या गॅंगस्टरचा संताप झाला. या केसनंतर बिश्नोई गॅंग सलमानच्या मागे लागली आहे आणि लॉरेन्स त्याच्यावर नाराज असून तेव्हापासून सलमानची हत्या करू इच्छितो. आपला समुदाय काळविटाचा रक्षक आहे. त्यामुळे आपण सलमानचे प्राण घेऊ इच्छितो, असे लॉरेन्सने म्हटले आहे म्हणूनच सलमानला मारण्यााठी त्यांनी अनेकदा कट रचला. ‘रेडी’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यानही लॉरेन्सने सलमानला मारण्याचा प्लॅन आखला होता.
वास्तविक, सलमान खानच्या काळवीट प्रकरणातही बिश्नोई समाजाचे नाव खूप चर्चेत होते. बिश्नोई समुदाय जोधपूरजवळील पश्चिम थारच्या वाळवंटातून येतो आणि निसर्गाच्या प्रेमासाठी ओळखला जातो. बिष्णोई समाजात निसर्गाला देव समान मानले जाते, त्यांचे निसर्गावर प्रेम असे आहे की ते त्याचे रक्षण करण्यासाठी जीव द्यायला तयार असतात. त्याचबरोबर इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा बिष्णोई समाजाने निसर्गासाठी अनेक चळवळी केल्या आणि निसर्गाच्या चळवळीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. परंतु लॉरेन्स गॅंगचा सध्या बिष्णोई समाजाची काहीही संबंध नाही, असे या समाजातील नेते सांगतात.
सन १७८७ मध्ये त्यावेळच्या सरकारने जोधपूर संस्थानात झाडे तोडण्याचे आदेश दिले होते तेव्हा बिष्णोई समाजाचे लोक विरोध करत होते. याशिवाय बिष्णोई समाजातील अमृता देवी यांनी पुढाकार घेत झाडाऐवजी स्वतःला अर्पण केले. बिष्णोई समाजातील ३६३ लोकांनी झाडांसाठी बलिदान दिले. त्याचबरोबर चिपको आंदोलनात विश्नोई समाजाचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहिले असतील, तर ज्यामध्ये एका महिला हरणाला तिचे दूध पाजताना दिसते, या स्त्रिया बिश्नोई समाजातील आहेत, जिथे हरणांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवले जाते आणि स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या मुलांप्रमाणे हरणांचे पालनपोषण करतात आणि त्यांचे दूध देखील पाजतात.
Bollywood Actor Salman Khan Murder Attempt