मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. सलमान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत असल्याने या सिनेमाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. जगभरात हा सिनेमा ५७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
देशात हा सिनेमा ४५०० स्क्रीन्सवर तर १०० देशांमध्ये हा सिनेमा १२०० स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. त्यामुळे एका दिवसात या सिनेमाचे तब्बल १६०० शो दाखवले जाणार आहेत. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणा-या या सिनेमात पूजा हेगडे सलमानची अभिनेत्री आहे.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1648921938838925315?s=20
रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा किती कोटीची कमाई करतो याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. ईदच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे तसेच लगेचच वीकेंड आल्यामुळे ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. या चित्रपटात सलमान, पूजा हेगडेसह शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गील, पलक तिवारी हे कलाकार आहेत.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1646793531623878656?s=20
https://twitter.com/Beingsav21/status/1649005406163996673?s=20
Bollywood Actor Salman Khan Movie kisi-ka-bhai-kisi-ki-jaan