शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काय सांगता? ‘दबंग’ सलमान खानने देखील घेतले मित्राकडून कर्ज

by India Darpan
ऑक्टोबर 6, 2022 | 5:24 am
in मनोरंजन
0
salman khan

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमान खान हा सर्वांचाच लाडका. अभिनेता म्हणून त्याचे अनेक चाहते आहेतच पण एक माणूस म्हणूनही अनेकजण त्याच्यावर प्रेम करतात. सलमानचा मित्र परिवार मोठा आहे. बॉलिवूडपासून ते मराठीतील कलाकार त्याचे मित्र आहेत. कोणत्याही मित्राच्या मदतीला धावून तो जातो, अशाच एका मित्राचा त्याने किस्सा सांगितला आहे. चित्रपटांमधून अभिनेता म्हणून दिसणारा सलमान लवकरच ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वात सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे.

नुकताच तो ‘कपिल शर्मा शो’मध्ये आला होता. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी येत असतात. आपले करियर, खासगी आयुष्य याबद्दल कपिल त्यांना विचारतो आणि ते देखील मोकळेपणाने बोलतात. सलमान अनेकदा या कार्यक्रमात येऊन गेला आहे. नुकताच तो यात आला असताना, कपिलने त्याला तू कधी कोणाकडून पैसे उधार घेतले आहेस का, असा प्रश्न विचारला. विशेष म्हणजे, सलमान खानने या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले. सलमान सांगतो, आजवर मी ती उधारी चुकवतो आहे.

असे का या प्रश्नावर सलमान म्हणतो, माझ्या एका मित्राच्या मुलाला मी नुकतेच लाँच केले आहे. हा तोच मित्र आहे, ज्याच्याकडून मी उधार घेतले होते. मी याच मित्राकडून २००० रुपये उधारीवर घेतले होते. मला गाडीत पेट्रोल भरायचे होते, आणि माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्या मित्राकडून पैसे घेतले होते मला कल्पना नव्हती त्या पैशांच्या बदल्यात मला हे करावं लागेल’. सलमान खानचे हे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.

१९८९ मध्ये आलेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून सलमानला ओळख मिळाली. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘दबंग’सारख्या चित्रपटातून एक वेगळा ट्रेंड त्याने बॉलिवूडमध्ये आणला. २०२१ साली आलेल्या ‘अंतिम’ या चित्रपटात तो दिसला होता.

सलमान लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. मेगास्टार चिरंजीवी याच्याबरोबर तो ‘गॉडफादर’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा ‘टायगर ३’ लवकरच येऊ घातला आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये पाहून कलाकार असेल. सध्या तो ‘किसी का भाई किसी की जान’ आणि बिग बॉस १६ च्या चित्रीकरणात बिझी आहे.

Bollywood Actor Salman Khan Loan Friend

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिटबुल जातीच्या कुत्र्यांचे वैशिष्ट्य काय? ते धोकादायक असतात का? ते आक्रमक का होतात?

Next Post

तेल विक्रेते ते अब्जाधीश उद्योगपती; असा आहे अझिम प्रेमजी यांचा यशोप्रवास…

India Darpan

Next Post
azim premji

तेल विक्रेते ते अब्जाधीश उद्योगपती; असा आहे अझिम प्रेमजी यांचा यशोप्रवास...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011