इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या चाहत्यांसाठी सलमान खान ‘दबंग टूर’च्या माध्यमातून देश-विदेशात आपल्या लाईव्ह शोचे आयोजन करत असतो. सलमान हा असा कलाकार आहे ज्याचा जगभरात अफाट चाहतावर्ग आहे. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी हवं ते करायला तयार असतात. दरम्यान, कित्येक दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे ही दबंग टूर लांबणीवर पडली होती. परंतु आता योग्य ती काळजी घेत दबंग टूरचं आयोजन करण्यात आलं आहे. सलमानची ही ‘दबंग टूर’ सध्या कोलकात्यात पोहोचली आहे. १३ मे रोजी सलमानच्या उपस्थितीत कोलकाता येथील ऐतिहासिक ईस्ट बंगाल क्लबमध्ये ‘दबंग टूर’ कॉन्सर्ट सोहळा रंगणार आहे.
हे आहेत तिकिटांचे दर
सलमानच्या या टूरमध्ये चाहत्यांनासुद्धा समाविष्ट होता येईल. त्यासाठी ६९९ पासून ते ३ लाखांपर्यंतची तिकिटे उपलब्ध आहेत. साध्या तिकिटांचे दर ६९९ रुपयांपासून ते ४० हजारांपर्यंत असून तुम्हाला व्हीआयपी लाउंजमध्ये प्रवेश हवा असल्यास, त्यासाठी तब्बल २ लाख ते ३ लाख रुपये मोजावे लागतील.
हे सेलिब्रिटी राहणार हजर
सलमान खानच्या दबंग टूर कॉन्सर्टमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. प्रभू देवा, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, गायक गुरु रंधावा, आयुष शर्मा आणि मनीष पॉल यांसारखे सेलिब्रिटी कोलकातामध्ये सलमानसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसणार आहेत. दरम्यान, दबंग टूरवर असताना सुपरस्टार सलमान खान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1655610298496352256?s=20
Bollywood Actor Salman Khan Da Bangg Tour Kolkata