मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता सलमान खानला धमक्या येण्याचा सिलसिला संपण्याचे नाव घेत नाही आहे. पुन्हा एकदा भाईजानला धमकी मिळाली आहे. एका कॉलरने पोलीस कंट्रोलला फोन करून ३० तारखेला सलमान खानला मारणार असल्याचे सांगितले आहे.
बॉलीवूडच्या दबंग खानचा धोका काही कमी होत नाहीये. अलीकडेच, अभिनेत्याला गोल्डी ब्रारकडून धमकीचा ईमेल आला होता, त्यानंतर त्याने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता मेलचे कनेक्शन यूकेमधून असल्याचे निष्पन्न झाले. आता पुन्हा एकदा सलमानवरील धोका वाढताना दिसत आहे.
सोमवारी रात्री ९ वाजता मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला. यादरम्यान फोन करणाऱ्याने ३० तारखेला सलमान खानला मारणार असल्याचे सांगितले. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख रॉकी भाई अशी करून दिली आणि तो जोधपूरचा गोरक्षक असल्याचे सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असले तरी सलमानला धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अभिनेत्यासोबत असे अनेकदा घडले आहे.
Bollywood Actor Salman Khan Again Threat Call