इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडमधील अनेक जोड्या कायम चर्चेत असतात. रील लाइफसोबतच रिअल लाईफ एन्जॉय करणाऱ्या अनेक जोड्या आहेत. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांचं नाव यात पहिल्या नंबरवर आहे. हे दोघेही काही दिवसांपूर्वी ‘वेड’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रितेशने ‘वेड’चं दिग्दर्शन केलं होतं. रितेश आणि जेनेलियाची जोडी ही चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. चाहत्यांसोबत ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. रितेशने नुकतेच केलेले रील हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे. या रिलद्वारे त्याने सुखी जीवनाचे रहस्य सांगितले आहे.
काय सांगतो रितेश?
रितेश आणि जेनिलिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर रील्स शेअर करताना दिसतात. इन्स्टाग्रामवरही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. रितेशने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नीच्या कटकट करण्याबद्दल बोलतो आहे. “जर तुमची पत्नी तुमच्याबरोबर जास्त कटकट करत असेल, तर सरळ चप्पल उचला आणि ती घालून सरळ बाहेर जा. त्यापलीकडे जास्त काही विचारही करु नका… नाहीतर नको ते होऊन बसेल”, असे रितेश या व्हिडीओत सांगतो आहे. रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना त्याला “सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र”, असे कॅप्शन दिले आहे.
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट
रितेशच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तर एकाने ‘डरपोक माणूस’ अशी कमेंट केली आहे. तर काहींनी ‘Hahahaha’ अशी कमेंट केली आहे. ’३६ गुणांपैकी नवरीकडे ३५ गुण असतात. नवऱ्याकडे एकच गुण असतो ते म्हणजे गप्प राहणं,’ असं एकाने म्हटलंय. ‘पत्नीची भीती’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
Bollywood Actor Riteish Deshmukh Happy Married Life Video