इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात काम करणारे कलाकार त्यांच्या चाहत्यांच्या खूप जवळ असतात. चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची अपडेट हवी असते. चाहतेही हे ओळखून आपल्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात.
बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेतलं कपल म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. वाढदिवस असो किंवा दीपिकाची ऑस्करवारी दोघांनी एकमेकांसाठी एकही सोशल मीडिया पोस्ट टाकली नाही. त्यामुळे दोघंही घटस्फोट घेणार अशा अफवाही सुरू झाल्या. त्यावर कोणीच काहीच बोलत नव्हते. नुकतंच रणवीर सिंगने आपल्या नात्यावर मौन सोडले आहे. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स अवॉर्ड्स’मध्ये रणवीरने एक विधान केले.
‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स अवॉर्ड्स २०२३’साठी अनेक कलाकार आणि खेळाडू एकत्र आले होते. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या फेव्हरेट कपलने नेहमीप्रमाणेच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, तर या कार्यक्रमात रणवीर-दीपिकाने प्रकाश पदुकोण यांच्यासोबत हजेरी लावली. यावेळी होस्टच्या एका प्रश्नावर दीपिका तिचा पहिला चित्रपट ‘ओम शांती ओम’ मधील डायलॉग म्हणते. ‘अगर आप किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश में लग जाती है. यानंतर सर्व टाळ्या वाजवतात तेव्हाच रणवीर सिंग माईक घेऊन सांगतो, ‘मला विचारा, याची खात्री देऊ शकतो मी.” यानंतर रणवीरच्या या वाक्यावर सगळ्या सभागृहात एकाच हशा पिकला. सगळे हसले असले तरी त्याच्या वाक्यात खूप गोष्टी सामावल्या होत्या.
@RanveerOfficial & @deepikapadukone being flirty at the Indian Sports Honors awards ??#RanveerSingh #Deepveer #DeepikaPadukone pic.twitter.com/nocjPnG8nU
— RANVEER SINGH TR FC (@Ranveer_Turkiye) March 27, 2023
काही दिवसांपूर्वी दीपिकाने रणवीरला इग्नोर केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गाडीतून उतरल्यानंतर रेड कार्पेटवर येत असताना रणवीर दीपिकाचा हात पकडण्यासाठी पुढे येतो मात्र दीपिका त्याला हात देत नाही. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि सगळीकडेच त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं.
आता रणवीरच्या या कमेंटनंतर या चर्चा थांबतील अशी अपेक्षा आहे.
दीपिकाचा ‘पठाण’ सिनेमा नुकताच रिलीज झाला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता ती आगामी ‘फायटर’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यामध्ये हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंग आणि आलिया भटचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Bollywood Actor Ranveer Singh on Deepika Padukon Divorce