गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

न्यूड फोटोशूट आलं रणबीरच्या अंगाशी; दीपिकाचे अद्यापही मौनच

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 5:31 am
in मनोरंजन
0
Ranveer Singh

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड विश्वात कधी काय होईल हे सांगता येत नाही. नुकतेच अभिनेता रणवीर सिंगने ‘पेपर’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. मात्र हे फोटोशूट त्याच्या अंगाशी आलं आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत त्याच्यावर जोरदार टीकाही झाली. याप्रकरणी त्याच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते, मात्र त्यावेळी तो घरी नव्हता. पोलिसांनी रणवीर सिंगला २२ ऑगस्टपर्यंत जबाब नोंदवण्यास सांगितलं होतं. आता रणवीरने मुंबई पोलिसांकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

गेल्या महिन्यात रणवीरने ‘पेपर’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं होतं, ज्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. ट्रोल झाल्यानंतर रणवीर सिंगने एका मुलाखतीदरम्यान वक्तव्य केलं होतं की, ‘हे माझं आयुष्य आहे आणि मी माझं काम कोणत्याही प्रकारे करू शकतो. मला वाटल्यास मी हजार लोकांसमोर न्यूड होऊ शकतो आणि त्यामुळे मला काही फरक पडत नाही. पण मी असं केलं तर लोकांची गैरसोय होईल.”

याप्रकरणी रणवीरला समन्स बजावण्यासाठी मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते, मात्र त्यावेळी तो घरी उपस्थित नव्हता. तो शूटिंगसाठी शहराबाहेर गेला होता. पोलिसांना समन्स न सोपवताच परतावं लागलं होतं. मात्र, मुंबई पोलीस पुन्हा त्याच्या घरी जाऊन नोटीस देणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्याआधीच रणवीरच्या बाजूने ही बातमी समोर आली आहे. याप्रकरणी २२ ऑगस्टला रणवीर चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहणार होता.

रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूटवर महिला आयोगानेही आक्षेप घेतला होता. तर दुसरीकडे रणवीर सिंगच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड स्टार्स उभे राहिले. तसंच काही जणांनी त्याची जोरदार स्तुती केली. फोटोशूटच्या एका दिवसानंतर रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे फोटो शेअर केले होते. मात्र रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Bollywood Actor Ranveer Singh nude photoshoot

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदींनी सहकारी केंद्रीय मंत्र्यांकडे मागितला हा अनोखा हिशोब? आता काय होणार?

Next Post

मोठा निकाल! कैद्याच्या हत्येप्रकरणी तब्बल १५ जणांना फाशीची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निर्णय

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

मोठा निकाल! कैद्याच्या हत्येप्रकरणी तब्बल १५ जणांना फाशीची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निर्णय

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011