मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – बॉलीवूड मधील अनेक कलाकारांच्या विवाहाबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना नेहमीच उत्सुकता असते. आता सध्या अशाच आणखी एका सेलीब्रिटी कपल चांगली चर्चा रंगली आहे. बॉलिवूड कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून गाजत होत्या, पण पहिल्यांदाच एक स्पष्टीकरणाचे वृत्त समोर येत आहे.
आनंदाची बातमी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचे लग्न याच महिन्यात होणार आहे. मात्र अद्याप तारीख जाहीर झाली नसली तरी एप्रिलच्या मध्यावर होणाऱ्या या लग्नासाठी फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनाच आमंत्रित करण्यात येणार आहे.
याआधी, रणबीर आणि आलियाच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला होता की, लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. अलीकडे, रणबीरची आई नीतू कपूर सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या स्टोअरमध्ये आणि मनीष त्याच्या घरी दिसली.
एका रिपोर्ट्सनुसार, लग्नाचे ठिकाण मुंबईतील चेंबूर येथील आर.के. हाऊस असू शकते. याआधी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती. परंतु आता कुटुंबीयांना हे लग्न मुंबईतच ठेवायचे आहे, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.
आलिया भट्ट नुकतीच ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यासोबत आरआरआरमध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. यानंतर ती तिचा बॉयफ्रेंड व होणारा नवरा रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. तसेच दुसरीकडे, रणबीर शमशेरा चित्रपटामध्ये वाणी कपूर आणि संजय दत्तसोबत दिसणार आहे.