मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूड मधील असे मोजकेच कलाकार आहेत की, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. केवळ नायक म्हणून नव्हे तर खलनायक म्हणजेच व्हीलन असो की कॉमेडी कलाकार किंवा चरित्र अभिनेता अशा सर्व प्रकारच्या भूमिका करणारे खूप थोडेच कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीत आहेत, त्यामध्ये परेश रावल अभिनेता परेश रावल यांचा समावेश होतो. बॉलिवूड अभिनेता परेश रावल त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात.
कॉमेडी असो, गंभीर व्यक्तिरेखा असो की खलनायकी असो, पडद्यावर आपली प्रत्येक भूमिका उत्तमरित्या त्यांनी साकारली आहे. परेश रावल यांचा आज वाढदिवस आहे. परेश रावल यांना प्रेक्षकांनी प्रत्येक पात्रात पाहिले आणि आवडले. चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे लव्ह लाईफही खूप इंटरेस्टिंग होते.
परेश रावल यांचा जन्म दि. 30 मे 1955 रोजी मुंबईत झाला. रावल यांनी मुंबईतील विलेपार्ले येथील नरसी मुंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे लग्न स्वरूप संपत यांच्याशी झाले आहे. ती एक अभिनेत्री देखील आहे. तसेच ती १९८९ च्या मिस इंडिया स्पर्धेची विजेती ठरली आहे. त्यांना दोन मुले आहेत.
अभिनेत्याची लव्ह लाईफही फिल्मी आहे. रावल यांनीच एकदा एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. आपल्याच बॉसच्या मुलीच्या प्रेमात ते कसे पडले हे सांगितले. या मुलीशी लग्न करण्याचा विचारही त्यांनी केला होता. परेश रावल यांनी हा प्रकार त्यांच्या मित्राला सांगितला होता. प्रेमात पडल्यानंतर परेश रावलने स्वरूप संपत यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र तब्बल बारा वर्षांनंतर परेश रावल आणि स्वरूप संपत यांचा विवाह झाला.
‘हेराफेरी’मधील बाबूराव गणपतराव आपटे असोत किंवा ‘वेलकम’मधील डॉक्टर घुंगरू होले असोत अनेक चित्रपटांमध्ये या अभिनेत्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. परेश रावल यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर चांगली छाप सोडली आहे. परेश रावल चित्रपटांसोबतच राजकारणातही सक्रिय आहेत. गेल्या तीन दशकांपासून परेश रावल रशिकांचे मनोरंजन करत आहेत. कोणत्याही विषयावर ते आपले मत मांडत असतात. परेश रावल हे चित्रपट निर्माते, अभिनेते, विनोदी कलाकार आणि खासदार देखील आहेत. ते 2014 ते 2019 पर्यंत अहमदाबादचे खासदार होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून जिंकले होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे समर्थक देखील मानले जातात.
परेश रावल यांचा गोलमाल फन अनलिमिटेड हा रसिकांच्या सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे.परेश रावल यांनी सोमनाथ या दिव्यांग व्यक्तीची भूमिका साकारली आहे. भागम भाग या चित्रपटात परेश रावल यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात त्यांनी चंपक उर्फ चंपू चतुर्वेदीची भूमिका साकारली होती. याशिवाय ते भूल भुलैया या चित्रपटातही होते. हा एक सायकॉलॉजिकल हॉरर चित्रपट आहे. त्यात बटू शंकर उपाध्याय यांची भूमिका केली होती. तसेच हेरा फेरीमध्येही ते दिसले होते. हा चित्रपट आजही अनेकांचा खूप आवडता आहे.