अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह ‘ओनोमॅटोमॅनिया’ या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांनी स्वतःच याविषयी माहिती दिली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की ते एका आजाराने त्रस्त आहेत, ज्याचे नाव आहे ‘ओनोमॅटोमॅनिया’ आहे. या आजारामुळे तो शांतपणे जगू शकत नाही. ‘ओनोमॅटोनिया’ ही एक वैद्यकीय स्थिती आहे. ज्यामध्ये लोकं काही शब्द पुन्हा पुन्हा सांगतात. “मी विनोद करत नाही, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आजाराविषयी माहिती काढू शकता. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा शब्द किंवा वाक्य अनावश्यकपणे पुन्हा सांगत राहता. माझ्याकडून तर हे नेहमी होत असल्याने मी कधीच आरामात राहू शकत नाही.” असे शाह यांनी सांगितले. अनेकदा झोपेत असतानाही ते त्यांच्या आवडीचे कोणतेही वाक्य पुन्हा पुन्हा सांगत असतात.
डॉक्टरांनीही शाह यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा दिला आहे. ओनोमेटोनिया हा एक आजार आहे. ऑनोमॅटोमॅनिया ही अशी स्थिती आहे जिथे एखादी व्यक्ती विशिष्ट शब्द, वाक्प्रचार किंवा एखाद्या मुद्द्याबद्दल विचार करत राहते आणि संभाषणात त्याचा वारंवार वापर करते. ओनोमेटोमॅनिया हा एक आजार किंवा मानसिक स्थिती नाही. तथापि, ही परिस्थिती काही लोकांना त्रास देऊ शकते. या समस्येमुळे त्यांच्या दिनक्रमावर परिणाम होतो. नसरुद्दीन शाह अलीकडेच आपल्याला दीपिका पदुकोणच्या गेहराईया चित्रपटात दिसले होते. याशिवाय ‘कौन बनेगा शिखरावती’ या वेबसीरिजमध्येही ते किंगच्या भूमिकेत आपल्याला दिसले होते. त्यामुळे सातत्याने मुलाखती ते देत असून, या मुलाखतीतच त्यांनी आजाराविषयी माहिती दिली.