इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील एक सुवर्णकाळ नायक मिथुन चक्रवर्ती यांनी स्वतःच्या अभिनयाने गाजवला. नृत्यामध्ये देखील त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘डिस्को डान्सर’ म्हणून मिथुन चक्रवर्ती यांनी आपली एक वेगळी छाप पडली होती. सध्या सगळ्यांचे आवडते मिथुनदा हे ‘सारेगमप’ शोमुळे चर्चेत आहेत. या शोच्या सेटवरील अनेक धमाकेदार व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिथुन चक्रवर्ती आणि भारती सिंहचा एक काॅमेडी व्हिडीओ तर चाहत्यांना प्रचंड आवडला होता. ‘सारेगमप’च्या मंचावरून आता मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. हे विधान करताना मिथून चक्रवर्ती भाऊक झाले होते.
मिथुन चक्रवर्ती हे नाव बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. बॉलिवूडचे अभिनेते असो किंवा इतर क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती प्रत्येकाची इच्छा असते की, आपल्या आयुष्यावर एक बायोपिक तयार व्हावा. मात्र, याला अभिनेते मिथुन चक्रवर्ती अपवाद आहेत, मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या आयुष्यावर बायोपिक अजिबात तयार केला जाऊ नये, असं स्पष्ट सांगितलंय. माझ्या आयुष्यावर कोणताही चरित्रपट तयार व्हावा, असं मला अजिबात वाटत नसल्याचे मिथुनदा सांगतात. हे बोलतानाच याची काही कारणेही मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितली आहेत.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, माझ्या आयुष्यात मी जे काही दिवस पाहिले आहेत, ते दुसऱ्या कोणीच बघू नयेत असे मला कायमच वाटते. प्रत्येकाने संघर्ष आणि वाईट दिवस पाहिले आहेत. परंतु माझ्या रंगामुळे मला नेहमीच अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या रंगामुळे अनेक वर्षे माझा अपमान झाला. मी असे दिवस पाहिले आहेत, जेव्हा मला रिकाम्या पोटी झोपावे लागायचे मात्र उपाशी पोटी झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी मला खायला काय मिळेल हे मला माहित नसायचं. मिळेल का हे सुद्धा मला माहीत नसायचं. मी फुटपाथवर झोपायचो. माझे आयुष्य खूप खडतर राहिले आहे. तेव्हा माझा बायोपिक हा कुणासाठी आदर्श नाही होऊ शकत पण किमान माझं आयुष्य पाहून कुणी तुटून जाऊ नये असं मला वाटत. ‘सारेगमप’च्या मंचावरून मिथुन चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले आहे.
Bollywood Actor Mithun Chakraborty Emotional