मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड इंडस्ट्रीत येणं हे प्रत्येक अभिनयप्रेमीचं स्वप्न असतं. अनेकजण या इंडस्ट्रीचा भाग सहज बनतात, पण अनेकांसाठी इथपर्यंतचा प्रवास आव्हानात्मक राहतो आणि अनेक संघर्षानंतर ते इथपर्यंत पोहोचतात. अशा पैकीच एक आहे तो म्हणजे मनोज बाजपेयी. ज्याला अभिनेता नाही तर अभिनयाची संपूर्ण संस्था म्हणतात. त्याच्या अभिनयाचे चाहते वेडे आहेत. आज त्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्याच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक बाबी…
अभिनेता मनोज बाजपेयी याचा आज वाढदिवस आहे. मनोज बाजपेयी याचा जन्म २३ एप्रिल १९६९ रोजी बिहारमधील बेलवा गावात झाला. आज अभिनेत्याचे नाव यश आणि प्रसिद्धीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे पोहोचणे प्रत्येकाच्या क्षमतेत नसते. आज तो ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. फार कमी लोकांना माहिती असेल की मनोजच्या जन्माच्या वेळी पंडितांनी भाकित केले होते की, मनोज अभिनेता होईल.
मनोजने आपल्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीपासून केली. मनोजला नेहमीच अभिनयाची आवड आहे. त्याच्या कामामुळेच त्याला शेखर कपूरच्या बॅंडिट क्वीन (१९९४) मध्ये मान सिंगची भूमिका मिळाली. या चित्रपटात मनोजने खूप दमदार भूमिका केली, पण त्याच्या करिअरमध्ये त्याच्या व्यक्तिरेखेचा काही उपयोग होऊ शकला नाही, पण ‘सत्या’ चित्रपटातील ‘भिकू म्हात्रे’ या व्यक्तिरेखेने मनोजचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले, त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. .
मनोजचे चित्रपटांमध्ये मोठे नाव आहे, परंतु प्रसिद्धीमध्येही तो अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना टक्कर देतो. मनोजने २०२१ मध्ये मुंबईतील अंधेरी येथे १९व्या मजल्यावर एक फ्लॅट विकत घेतला, जिथे तो त्याची पत्नी अभिनेत्री नेहा आणि मुलीसोबत राहतो. याशिवाय मनोजकडे कारचे खूप मजबूत कलेक्शन आहे, ज्याची किंमत एक कोटींच्या वर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोजची एकूण संपत्ती ११८ कोटी रुपये आहे.
मनोज बाजपेयी त्याच्या आगामी ‘साम बहादूर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशल, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा देखील स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
Happy Birthday Manoj Bajpayee Life Journey Property Family