इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रत्येक सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या देवाचा भक्त असतोच. या क्षेत्रातील ताण तणाव पाहता मेडिटेशन म्हणून काही धार्मिक गोष्टी करणे या आवश्यक झाल्या आहेत. यामुळे मनही शांत राहते. अशाच एका कारणासाठी अभिनेता गोविंदा पत्नी सुनितासह हिमाचल मधील ज्वालामुखी देवीच्या मंदिरात दिसले. गोविंदा यांची पत्नी सुनिता माँ ज्वालामुखीची भक्त असून दोघेही दरवर्षी दर्शनासाठी न चुकता येतात.
यंदा विशेष कारण
तसे तर गोविंदा आणि त्यांची पत्नी दरवर्षीच या मंदिरात येतात. पण यावर्षी काही खास कारण आहे. गोविंदा आणि त्यांच्या पत्नीने देवी मातेला काही साकडे घातले होते. ते पूर्ण झाल्याने आम्ही आल्याचे या दोघांनी सांगितले. देवी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी विधिवत पूजा आणि आरतीही केली. यावेळी, गोविंदांच्या चाहत्यांनी त्यांना भेटण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. अभिनेत्याने चाहत्यांसमवेत फोटोही काढला.
माँ ज्वालामुखीच्या आशीर्वादाने आमची मनोकामना पूर्ण झाली. म्हणून आम्ही पती-पत्नी देवी माताच्या मंदिरात माथा टेकण्यासाठी आलो, असे गोविंदाने सांगितले. यावेळी मंदिर प्रशासनाच्यावतीने गोविंदाचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच, देवी माताची चुनरी आणि सिरोपा हेही त्यांना भेट देण्यात आलं.