मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने सन २००३ ‘फुटपाथ’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने मर्डर, आशिक बनाया आपने, अक्सर असे अनेक हिट सिनेमे दिले. बॉलीवूडमध्ये त्यांची प्रतिमा रोमँटिक अभिनेत्यासारखी आहे, परंतु वैयक्तिक आयुष्यात तो अगदी सामान्य आहे. पण, त्याचे खरे नाव वेगळेच आहे. म्हणजेच त्याने त्याचे मूळ नाव बदलले आहे.
इम्रानला पहिल्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. वर्ष २००१ मध्ये, तो ये जिंदगी का सफर या चित्रपटातून पदार्पण करणार होता. नंतर चित्रपट निर्मात्याला वाटले की तो त्या भूमिकेसाठी योग्य नाही. त्यानंतर इमरानला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याने आपले नाव बदलून इम्रान असे ठेवले.
इमरान हाश्मीला अभिनेता बनायचे नव्हते. प्रत्येक पात्रात हरवलेल्या इमरानला कधीही अभिनेता बनायचे नव्हते. त्याला फिल्मी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहायचे होते. अभिनेता होण्यापूर्वी त्याला अभिनयाच्या या रंगीबेरंगी दुनियेत पाऊल ठेवायचे नव्हते. तो या क्षेत्रात अचानक आला होता.
कॅमेऱ्याला सामोरे जायला इम्रानला सतत भीती वाटायची. सुमारे ४० चित्रपटांमध्ये चांगली कामगिरी करूनही इमरान हाश्मीला कॅमेऱ्याची भीती वाटते. त्याने स्वत: सांगितले की, तो कॅमेऱ्याचा सामना करायला खूप घाबरतो. असे असूनही इम्रान लहानपणापासूनच अभिनय करत आहे. बालकलाकार म्हणून या अभिनेत्याने अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले आहे.
‘कॉफी विथ करण’मध्ये पाहुणा म्हणून इम्रान पोहोचला होता. तेथे त्याने सांगितले की, तो हिंदी चित्रपट पाहत नाही. त्यांनी फक्त एक-दोन हिंदी चित्रपट पाहिले आहेत. त्याला इंग्रजी चित्रपट पाहायला आवडतात.
फार कमी जणांना माहिती आहे की, इमरान हाश्मीने चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी त्याचे नाव बदलले आहे. वास्तविक, एका पंडिताने त्याला एकतर त्याचे नाव बदलून फरहान ठेवावे किंवा इम्रानमधील एक ‘ए’ काढून टाकावे, असे सुचवले. त्यावर त्याने आपले नाव बदलून फरहान ठेवले.