मुकुंद बाविस्कर, मुंबई
बॉलीवुड म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीत प्रत्येक कलाकाराला स्ट्रगल करावे लागते. सध्याच्या काळात प्रसिद्ध असलेले अभिनेते आणि अभिनेत्री यांना देखील सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करावे लागले होते, त्यातच काही चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर देखील त्यांना काही काळ संकटाला सामोरे जावे लागते, ही संकटे वेगवेगळ्या प्रकारची असतात, अशाच प्रकारची वेळ एका अभिनेत्यावर आली होती त्यामुळे तो डिप्रेशन मध्ये गेला होता.
सध्या बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल Zee5 वर लव्ह हॉस्टेलमध्ये दिसत आहे. यापूर्वी त्यांनी आश्रम या वेबसिरीजमध्येही काम केले आहे.त्याची व्यक्तिरेखा आणि अभिनय आश्रमातील प्रेक्षकांना खूप आवडला होता.
लव्ह हॉस्टेलमधली त्याची व्यक्तिरेखाही थोडी वेगळी आहे. या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत आहे. बॉबी देओलचा हा चित्रपट त्याच्या करिअरला पुन्हा चार चाँद लावू शकतो. पण एक काळ असा होता की बॉबीचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप झाले.
2018 मध्ये, बॉबी देओलने रेस 3 आणि हाऊसफुल 4 मध्ये पुनरागमन केले. पण दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत. त्यानंतर तो खूप दुःखी झाला. एका संवादात बॉबी देओलने स्वतः सांगितले की, तो संपूर्ण तीन वर्षांपासून डिप्रेशनमध्ये जगत आहे.
बॉबीने सांगितले की, यावेळी त्याने स्वतःला सावरले. या काळात तो स्वत:चा आधार बनला आणि स्वत:वर विश्वास ठेवायला शिकला. तो म्हणाला की, कुटुंब हा आधार असू शकतो, परंतु या काळात तुम्हाला स्वत:ची मदत करावी लागेल.
बॉबीने म्हणाला की, जेव्हा त्याने करिअरची सुरुवात केली तेव्हा प्रेक्षकांनी त्याला खूप पसंत केले आणि त्याला खूप काम मिळायचे. पहिल्याच चित्रपटात प्रेम मिळाले नसते तर इतके काम मिळाले नसते, असेही तो म्हणाला. तसेच बॅक टू बॅक हिट्स दिल्याचे बॉबीने सांगितले. चुकीचे चित्रपट निवडल्याने त्याला काम मिळणे बंद झाले.
बॉबी म्हणतो की, फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर त्याला काम मिळाले नाही, यावरून असे दिसून येते की, त्याच्या वडिलांमुळे त्याला नेहमीच काम मिळू शकत नाही. त्याने त्याच्या आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत, ज्यामुळे तो एक चांगला माणूस बनला आहे.