मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि वेळोवेळी त्यांच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या आहेत. अर्जुन कपूरने मलायका अरोराच्या बिल्डिंगमध्ये 4 BHK फ्लॅट खरेदी केल्याचे उघड झाल्यानंतर गेल्या वर्षी अर्जुन आणि मलायका यांच्या लग्नाबद्दल अटकळ बांधली जात होती. आता अर्जुन कपूरने आपला फ्लॅट विकल्याची माहिती आहे.
अर्जुन कपूरने वांद्रे येथील 81 औरत इमारतीच्या 19व्या मजल्यावर फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट 4364 स्क्वेअर फूटमध्ये बांधला आहे. त्याने तो 20 कोटींना विकत घेतला होता. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन कपूरने 4 कोटींचा तोटा सहन करुन आता हा फ्लॅट 16 कोटींना विकला आहे. फ्लॅटची नोंदणी १९ मे रोजी झाली. अर्जुनची बहीण अंशुला कपूर हिने कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. अर्जुन कपूर हा सध्या जुहू येथील रहेजा ऑर्किडच्या सातव्या मजल्यावर राहतो.
अर्जुन कपूरने आपला फ्लॅट विकल्याच्या आठवडाभर आधी करण कुंद्राने त्याच इमारतीत 14 कोटींना आपला फ्लॅट विकत घेतला होता. मार्च 2020 मध्ये सोनाक्षी सिन्हाने याच इमारतीच्या 16व्या मजल्यावर 14 कोटींना फ्लॅट खरेदी केला होता. त्याच्याशिवाय क्रिकेटर पृथ्वी शॉने फ्लॅटसाठी 10.5 कोटी दिले. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यानेही याच इमारतीच्या 19व्या मजल्यावरील फ्लॅटला 9.95 कोटी रुपये देऊन खरेदी केला आहे.
Bollywood Actor Arjun Kapoor Sale Mumbai Flat Cost