इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणी तरी आदर्श असतोच. त्यांच्या आयुष्यात त्यांचा एक रिअल हिरो असतो. मुलांच्या आयुष्यात त्यांचा बाबा त्यांचा हिरो असू शकतो तर इतरांच्या अजून कुणी ! दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या रियल लाइफ हिरोबद्दल खुलासा केला आहे. त्यांच्या हिरोचं नाव ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. पण तुम्हाला त्यांचा अभिमानही वाटेल. अनुपम खेर यांच्या रियल लाइफमधील हिरोचं नाव आहे हिमा दास.
अनुपम खेर यांच्यासाठी हिरो असलेली हिमा दास त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे. पण या मुलीने भारताच नाव उज्ज्वल केलं आहे. धावपटू हिमा दास देशाचा सन्मान वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. हिमा दास आता अवघ्या २२ वर्षांची आहे. आयएएएफ वर्ल्ड अंडर २० एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं. हिमाने ५१.४६ सेकंद वेळेसह विजय मिळवला होता. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मोटिवेशनल स्पीकर अनुपम खेरही तिचे चाहते आहेत.
अनुपम खेर हिमा दासला गुवाहाटीमध्ये भेटले. तिला भेटून अनुपम खेर यांना प्रचंड आनंद झाला. हिमा दास माझी हिरो आहे, असे शब्द त्यांच्या तोंडून निघाले. देशी सोशल मीडिया कू ऍपने अनुपम खेर यांचा सुंदर व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात ते हिमा दास बरोबर चालताना दिसतायत. हिमा दासला भेटण एक प्रेरणादायक अनुभव होता, असं त्यांनी सांगितलं. पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी त्याचा उल्लेखही केलाय.
Bollywood Actor Anupam Kher Life Hero
Entertainment Hima Das