सोमवार, नोव्हेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिनेता अनुपम खेर यांनी शाळेतल्या पहिल्या नाटकाचा सांगितला तो किस्सा…..

नोव्हेंबर 25, 2022 | 12:30 pm
in मनोरंजन
0
Anupam Kher

 

पणजी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “जन्मापासूनच कोणी अभिनेता नसते. शाळेतील नाटकात माझा पहिला अभिनय एक संकटच होते. मात्र, मी केलेल्या सर्वोत्तम प्रयत्नांसाठी माझ्या वडिलांनी संध्याकाळी मला फुले भेट दिली.” गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पार्श्वभूमीवर, ‘पडदा आणि नाटकांसाठीचे सादरीकरण’ या विषयावर आज घेतलेल्या मास्टरक्लास दरम्यान ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर बोलत होते.

साधारण पार्श्वभूमी असतानाही ते यशस्वी अभिनेता कसे बनले याचा जीवनप्रवास त्यांनी यावेळी सांगितला. त्यांचे बालपण सिमला येथे एका संयुक्त कुटुंबात गेले. हा एकप्रकारे आशीर्वादच होता कारण तिथे बोलायला आसपास माणसे होती असे ते म्हणाले. “मला आजोबांची आणि वडिलांची खूप आठवण येते. वडील म्हणायचे ‘अपयश एक घटना आहे, व्यक्ती कधी अपयशी होत नसते.’ जोपर्यंत मी पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत मी पराभूत होऊ शकत नाही” असे अनुपम खेर यांनी सांगितले.

इतर कोणत्याही क्षेत्र किंवा व्यवसायाप्रमाणेच अभिनयातील प्रशिक्षण देखील अतिशय महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. “प्रशिक्षण तुम्हाला आत्मविश्वास देतो. हे एखाद्या वाहन चालवायला शिकवणाऱ्या वर्गाप्रमाणे आहे. ते भीती दूर करते. अभिनयाचा कोणताही अभ्यासक्रम नसतो. हे सारे मानवी स्वभावाबाबत आहे.” असेही ते म्हणाले. भारतीय सिनेमा आपल्या अंतरंगाचा एक भाग असल्याचे अनुपम खेर मानतात.

“पूर्वीच्या काळी सिनेमा हेच मनोरंजनाचे एकमेव माध्यम होते.” असे ते म्हणाले. “अभिनेता भावनांनी आणि जीवनरसाने ओतप्रोत असला पाहिजे. निरिक्षण, कल्पना आणि भावनात्मक स्मृती ही अभिनेत्याची तीन शस्त्रे आहेत.” असे त्यांनी उत्तम अभिनेता कोण? हे विषद करताना सांगितले. “तुम्ही अभिनयाबरोबर खेळलात तर तुम्ही अधिक शिकू शकता”असा संदेश त्यांनी अभिनयाच्या विद्यार्थ्यांना दिला.

एका अभिनेत्याने, स्वतःला पूर्णपणे मूर्ख बनवण्यासाठी तयार राहायला हवे. जोपर्यंत तुम्ही मूर्ख बनत नाही, तोपर्यंत तुम्ही अभिनेता बनू शकत नाही. अभिनेता आणि व्यक्ती म्हणून स्वतःला गांभीर्याने घेऊ नका” असा सल्ला त्यांनी अभिनेत्यांना दिला.
“लोकांना मी आठवणी दिल्या पाहिजेत असे मला वाटते. आठवणी देणे महत्वाचे आहे, प्रत्येक क्षण जगायला हवा. तक्रार करण्याची आपल्याला सवय आहे. आयुष्य म्हणजे कृतीशीलता, टीका करणे नव्हे.” जीवन हा प्रवास आहे. ध्येय नाही असे ते म्हणाले.

“नाटक तुम्हाला लक्ष्यित एकाग्रता देते. संवाद आणि संकेत सारखेच राहत असले तरी प्रेक्षकांनुसार तुम्हाला सादरीकरणात बदल करावा लागतो. 40 दिवसांच्या तालमीनंतर हे येऊ लागते’. “प्रभूत्व हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू आहे. “नाटकात रिटेकला जागा नसते. म्हणून अनेक लोक याला हलक्यात घेतात!” अशा शब्दात त्यांनी नाटक आणि सिनेमातील फरक उलगडून सांगितला.

Bollywood Actor Anupam Kher on School First Drama
Entertainment IFFI Panji Goa Acting Film Movie

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चक्क दारुच्या बाटल्यांमध्ये परदेशातून आणले २० कोटींचे कोकेन; मुंबई विमानतळावर असे झाले उघड

Next Post

पंतप्रधान पीक विमा योजनेत होणार मोठा बदल; बघा, केंद्रीय कृषीमंत्रालय काय म्हणाले..

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
PM Crop Insurance

पंतप्रधान पीक विमा योजनेत होणार मोठा बदल; बघा, केंद्रीय कृषीमंत्रालय काय म्हणाले..

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011