इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता आमिर खान हा उत्तम अभिनय, चोखंदळ निवड आणि चांगल्या चित्रपट निर्मितीसाठी ओळखला जातो. गेली काही वर्षे अमीर खान चित्रपट निर्मितीमुळे दिसेनासा झाला होता. ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटावर तो काम करत होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यामुळे आमिर देखील अडचणीत सापडला होता. परंतु आता त्यातून सावरत त्याने आपल्या करिअरबाबत मोठा आणि तितकाच धक्कादायक निर्णय घेतला आहे. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात त्याने आपला हा निर्णय जाहीर केला. त्याचसोबत त्यामागची महत्त्वाची भूमिकाही मांडली.
अमीर खानचे काम आपल्या सर्वांना चांगलच माहित आहे. अभिनयात त्याचा हात कुणी पकडणार नाही. आता आमीर खान पुढील दीड वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार आहे. जवळपास १८ महिने तो रुपेरी पडद्यापासून लांब राहणार आहे. या धक्कादायक निर्णयाबाबत त्याने स्पष्टीकरण देखील दिले आहे. मी गेली काही वर्षे कामच करत आहे त्यामुळे मला कुटुंबाला वेळ देखील देता आलेला नाही. तेव्हा कामातून काही काळ ब्रेक घेऊन कुटुंबीयांना तो वेळ देणार असल्याचं आमिरने सांगितलं.
“जेव्हा मी अभिनेता म्हणून चित्रपटात काम करतो, तेव्हा त्या कामात मी पूर्णपणे व्यग्र होऊन जातो. माझ्या जीवनात दुसरं काहीच उरत नाही. याच कारणामुळे मी ब्रेक घेतोय. मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहायचंय. माझी आई, माझ्या मुलांसोबत वेळ घालवायचा असल्याचे त्याने सांगितले आहे. असे असले तरी निर्माता म्हणून तो त्याचं काम सुरूच ठेवणार आहे. “पुढील दीड वर्ष मी एक अभिनेता म्हणून नाही तर एक निर्माता म्हणून काम करणार आहे,” असं तो पुढे म्हणाला. आगामी ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचंही त्याने जाहीर केलं.
निर्माता – दिग्दर्शन याचे बाळकडू अमीर खानला लहानपणापासून मिळाले होते. त्याचे वडील ताहीर हुसेन हे प्रसिद्ध निर्माते होते तर ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात मिळालेल्या मुख्य भूमिकेपासून अमीर खानला ओळख मिळाली. याबाबत अमीर सांगतो कि, “मी १८ वर्षांचा असताना इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यावेळी मी इंडस्ट्रीत इतका गुंतून गेलो की मला खूप काही शिकायची इच्छा निर्माण झाली. पण आज मला जाणवतं की, माझ्या जवळच्या व्यक्तींना मी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. मी माझा पूर्ण वेळ कामासाठी दिला आणि कामासोबतचं नातं घट्ट केलं. माझं कुटुंब माझ्यासोबत नेहमीच राहील असं मी गृहीत धरलं. त्यावेळी मला प्रेक्षकांची मनं जिंकायची होती. त्या वाटेत मी इतका हरवून गेलो मी माझं कुटुंब माझी वाट पाहतंय हे विसरूनच गेलो होतो”, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. विविध सामजिक विषयाला हात घालून त्या विषयावर चित्रपट निर्मिती करण्यात अमीर खान प्रसिद्ध आहे.
Bollywood Actor Amir Khan Big Decision Movie
Entertainment Film Break