इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘हेरा फेरी ३’, ‘आवारा पागल दीवाना २’ आणि ‘वेलकम ३’… या तिन्ही सिक्वेलमध्ये अक्षय कुमार काम करणार की नाही? याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अलीकडेच अक्षय कुमारने सर्जनशील फरकामुळे ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागात काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यानंतर या चित्रपटात अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यन घेणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या अफवांना पूर्णविराम देत अक्षयने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, ‘त्याला स्क्रिप्ट आवडली नाही, म्हणून त्याने चित्रपट करण्यास नकार दिला. ‘
आता समोर येत असलेल्या रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की अक्षय कुमारच्या या वक्तव्यामुळे फिरोज नाडियादवाला खूपच नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी अभिनेत्याशिवाय ‘आवारा पागल दीवाना २’ आणि ‘वेलकम ३’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, फिरोज नाडियादवाला अक्षय कुमारवर नाराज आहे. ‘स्क्रिप्ट खराब आहे’ या अक्षय कुमारच्या वक्तव्याचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर परिणाम होऊ शकतो, असे त्याचे मत असून याची जाणीव असूनही अक्षयने असे वक्तव्य जाहीरपणे केले आहे.
अक्षय कुमारच्या जास्त फीमुळे निर्मात्यांना कार्तिक आर्यनला साइन करावे लागले अशीही बातमी समोर येत आहे. खरंतर अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’साठी जवळपास ९० कोटी रुपये फी मागत होता. पण, निर्मात्यांना चित्रपटाच्या बजेटमधील एवढी मोठी रक्कम स्टार्सच्या फीमध्ये खर्च करायची नव्हती, म्हणून त्यांनी अभिनेत्याला फी कमी करण्याची विनंती केली. मात्र, अक्षयने नकार दिला. अखेर निर्मात्यांनी कार्तिक आर्यनला साइन केले. या चित्रपटासाठी अभिनेत्याने ३० कोटी रुपये घेण्याचे मान्य केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते अजूनही या चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. पण आता प्रश्न असा पडतो की अक्षयच्या जागी कार्तिक आर्यन परफेक्ट असेल का? बरं, फक्त वेळच सांगेल. पण भूल भुलैया २ च्या यशाने कार्तिक आर्यनने सिद्ध केले आहे की त्याच्यातही प्रेक्षकांना भुरळ घालण्याची ताकद आहे.
Bollywood Actor Akshay Kumar Producer Firoz Nadiadwala
Film Movie Entertainment