मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान दमदार अभिनयासाठी आणि उत्तम आशयाच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याला आता वेगळ्या परिचयाची गरज नाही. गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या जवळपास प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका त्याने साकारल्या आहेत. याच कारणामुळे त्याला व्हर्सेटाइल अभिनेता देखील म्हटले जाते. मात्र, त्याच्या जीवनातील काही महत्त्वाच्या बाबी आपण आज जाणून घेणार आहोत…
तारे जमीन पर, गजनी, दंगल, लगान आणि रंग दे बसंती असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात आमिर खानने आपले वेगळेपण सिद्ध केले. मात्र आमिर खानच्या करिअरमध्ये एक काळ असा होता जेव्हा त्याचा प्रत्येक चित्रपट फ्लॉप ठरत होता. यावेळी रासिकांना वाटू लागले की, आमिर खान इंडस्ट्रीत फार काळ टिकणार नाही. आमिर खानचे करिअर बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले होते, तेव्हा कारण
आमिर खानचे हे 11 चित्रपट फ्लॉप ठरले.
आमिर खानच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत सर्वात वर फिल्म मेलाचे नाव येते. या चित्रपटात त्याचा भाऊही दिसला होता आणि मुख्य अभिनेत्री ट्विंकल खन्ना होती. बॉक्स ऑफिसवर हा १ चित्रपट फ्लॉप ठरला होता. मात्र आमिर खानच्या ट्रेडिशन, बाजी, टेरर ही टेरर, जवानी जिंदाबाद, अफसाना प्यार का, अकेले हम अकेले तुम, लव्ह लव्ह लव्ह, धोबीघाट, दौलत की जंग आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान हे १० चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले.
आमिर खानला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असा टॅग मिळाला असला तरी त्याच्या करिअरमध्ये त्याने अनेक चुकाही केल्या आहेत. आमिर खाननेही आपल्या कारकिर्दीत असे अनेक मोठे चित्रपट सोडले आहेत, ज्याचा त्याला नक्कीच पश्चाताप झाला असेल. आमिर खानने हम आपके है कौन, डर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, जोश, नायक, स्वदेश आणि साजन या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या.
माणूस चुकांमधून शिकतो असे म्हणतात, तसेच आमीर खान बाबदेखील म्हणता येईल, एकामागून एक होत असलेल्या चुकांमधून धडा घेत आमिर खानने स्वत:वर काम करायला सुरुवात केली आणि प्रेक्षकांशी थेट जोडले जाऊ शकतील, असे चित्रपट साइन केले. आमिर खानचा नवा चित्रपट लाल सिंग चड्ढा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्या बरोबर करीना कपूर खान दिसणार आहे. हा चित्रपट दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.