नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडको परिसरातील माजी नगरसेविका व त्यांचे पती त्यांच्याच प्रभागातील एक अपूर्ण काम वर्षानुवर्षे पूर्ण होत नसल्याने ते आता तरी सुरळीत व्हावे म्हणून तेथे बोकड बळी देणार असल्याची सोशल मिडीयात चर्चा आहे. त्यावर अंधश्रध्दा निर्मूलन संस्थेने प्रतिक्रिया दिली आहे.
अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले की, आहार कोणता असावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु नवसापोटी बोकडबळी ही निखालसपणे अंधश्रद्धा असल्याचे संतांनी म्हटले आहे. महाराष्ट्र अंनिस नवसापोटी पशुबळीला त्यामुळेच विरोध करते. शासकीय कामे व्हावे यासाठी योग्य मार्ग न अवलंबता समाजात अंधश्रद्धा वाढीस लावण्याचे हे कृत्य केले असल्याने अंनिस त्याचा निषेध करत आहे.
काम पूर्ण होण्यासाठी सिडकोतील माजी नगरसेविका देणार बोकड बळी…. ही सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यामुळे बोकडबळीवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. याअगोदही बोकडबळीवरुन प्रतिक्रिया उमटलेल्या आहे. त्यामुळे बोकड बळी दिला जातो की अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणखी पाठपुरावा केला जातो. हे पुढील काळात समजणार आहे.
BOKADBALI