मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद-ए-मिलाद हा सण रविवारी येत असून त्यापूर्वीच हा सण बोहरा समाजाने साजरा केला. बोहरी समाजाच्या प्रथेनुसार तो दोन दिवस अगोदर साजरा केला. यावेळी मनमाड शहरातून बोहरा समाजाच्या वतीने शिस्तबध्द मिरवणूक काढण्यात येऊन ईद-ए-मिलादचा सण आनंदात साजरा केला. या मिरवणूकीत लहानापासून वृध्दां पर्यंत बोहरी समाजातील नागरीक सहभागी झाले होते.