नवी दिल्ली – सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडे एअरटेल, व्होडाफोन – आयडिया, रिलायन्स जिओशी स्पर्धा करण्यासाठी प्रीपेड योजना आहे. बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक प्रकारचे नवीन प्लॅन ग्राहकांसाठी आणले आहेत. त्याती आता टेलिकॉम कंपन्यांनी देखील आपल्या रिचार्ज प्लॅन मध्ये भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र त्याचवेळी सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे.
रिलायन्स – जिओ, व्होडाफोन -आयडीया ( व्हीआय ) आणि एअरटेल यांनी प्री-पेड प्लॅनच्या किमती एकाच वेळी वाढवल्या आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही कंपन्यांनी सर्व प्री-पेड प्लॅनच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मात्र या तीन टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक जबरदस्त प्री-पेड प्लॅन आणला आहे. या परवडणाऱ्या प्लॅनने जीओ आणि एअरटेलला मागे टाकले आहे. त्याची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये यूजर्सना 300 दिवसांची वैधता, एसएमएस आणि दररोज 2 जीबी डेटा मिळेल. याशिवाय रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.
अप्रतिम प्रीपेड योजना
BSNL च्या या प्लॅनची किंमत 397 रुपये आहे. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जाईल. त्यामुळे मोबाईल वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतील. याशिवाय प्लॅनमध्ये 100 एसएमएस आणि पीआरबीटी सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये, प्लॅन वापरकर्त्यांना 300 दिवसांची कालमर्यादा मिळेल, जरी प्रीपेड प्लॅनमध्ये उपलब्ध सेवा फक्त 60 दिवसांसाठी वापरल्या जाऊ शकतात.
या योजनांना स्पर्धा
एअरटेलचा 359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: या प्लॅनची वेळ मर्यादा 28 दिवस आहे. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस दिले जातील. यासोबतच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. याशिवाय प्लॅनसोबत अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ , एअरटेल Extreme आणि Wynk Music चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाईल.
जिओचा 419 चा प्लॅन
हा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येतो. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळणार आहेत. यासोबतच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जाणार आहे. याशिवाय प्लॅनसोबत जिओ टीव्ही, मूव्हीज, सिक्युरिटी आणि क्लाउडचा अॅक्सेस मोफत दिला जाईल.
नवीन ब्रॉडबँड प्लॅन
बीएसएनएलने गेल्या महिन्यात 949 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन लॉन्च केला होता. हा ब्रॉडबँड प्लॅन OTT अॅप सबस्क्रिप्शनसह येतो. यामध्ये यूजर्सना 150 Mbps च्या स्पीडने 2000- GB डेटा मिळेल. याशिवाय, ब्रॉडबँड प्लॅनमध्ये BSNL सिनेमा प्लस, G5 प्रीमियम, Voot Select, Sony Liv Premium आणि Yupp -TV चे सबस्क्रिप्शन मोफत मिळतील.