इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अलीकडच्या काळात प्रत्येक त्यालाच वाटते की, आपल्याकडे स्वतःचे वाहन असावे त्यातच अत्याधुनिक आकर्षक आणि दणकट कार घेण्याकडे बहुतांश ग्राहकांचा कल असतो. त्यातच तरुणाईमध्ये बीएमडब्ल्यूची क्रेझ मोठ्या प्रमाणावर दिसून येते. सहाजिकच बीएमडब्ल्यू नवीन आकर्षक मॉडेल बाजारात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बीएमडब्ल्यू या कंपनीचे नाव ऐकल्यावर, वाचल्यावर आपल्या डोळ्यासमोर लग्झरी कार आणि महागड्या स्पोर्ट्स बाइक येतात. कारण कंपनी जगभर महागडी वाहने विकते.
बीएमडब्ल्यू कंपनीच्या बाइक जगभरात विकल्या जातात. या बाइक सर्वांना आवडतात, परंतु या बाइक प्रीमियम रेंजमध्ये येत असल्यामुळे त्यांचा ग्राहकवर्ग मर्यादित आहे. येतात. मात्र आता कंपनीने एक नवीन बाइक भारतीय बाजारात लाँच करून भारतीय ग्राहकांना आश्चर्यचकित केले आहे. कंपनीने भारतीय बाजारात त्यांची आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाइक लाँच केली आहे. बीएमडब्ल्यू जी 310 आरआर असे या स्पोर्ट्स बाइकचे नाव असून या बाइकची किंमत 2.85 लाख रुपये इतकी आहे. या बाईकची किंमत सर्वात स्वस्त असल्याने बुकींगसाठी गर्दी होत आहे.
विशेष म्हणजे ही बाइक टीव्हीएस अपाचे आरआर या बाइकच्या प्लॅटफॉर्मवरच तयार केली आहे. या दोन्ही बाइक डिझाईन आणि फीचर्सच्या बाबतीत सारख्याच आहेत. मात्र बीएमडब्ल्यूने यात बरेच बदल देखील करण्यात आले आहेत. तसेच या बाइकमध्ये कंपनीने 312.12 सीसी क्षमतेचे वॉटर कूल्ड सिंगल सिलेंडर, 4 व्हॉल्व्ह इंजिन दिले आहे. हे इंजिन 34 पीएस पॉवर आणि 27.6 न्युटन मीटर पीक टॉर्क जनरेट करू शकते.
या बाइकच्या टॉप स्पीडबद्दल सांगायचे झाल्यास, ट्रॅक आणि स्पोर्ट्स मोडमध्ये ही बाइक 160 किमी प्रतितास आणि रेन आणि अर्बन मोडमध्ये 125 किमी प्रति तास इतक्या वेगाने धावते. या बीएमडब्ल्यू बाइकमध्ये सिंगल फ्रंट डिस्क ब्रेक सिस्टिम देण्यात आली आहे. यात ऑल एलईडी लायटिंग, रियर प्री-लोड अॅडजस्टेबल सस्पेंशन, अपसाइड डाउन फोर्क सस्पेन्शन, रेडियल फ्रंट ब्रेक कॅलिपरसह मोठा डिस्प्ले देण्यात आला. ही बाइक ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट करतह येऊ शकते आणि बाइकच्या डिस्प्लेवर अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती दिसून येते.
BMW G 310 RR Sports Bike Launch in India Features and Price