मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार झाला असून पारदर्शकतेचा अभाव असल्याचा ठपक कॅगने ठेवला आहे. मुंबई महापालिकेच्या १२ हजार कोटींच्या कामांचे ऑडिट कॅगने केले असून त्यामध्ये प्रचंड प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल शनिवारी सभागृहात मांडण्यात आला. त्यातील काही ठळक मुद्दे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखविलेत.
विधानसभेतील काही सदस्यांनी कॅगच्या अहवालातील ठळक मुद्दे मांडण्याची विनंती केली. त्यानुसार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी कॅगच्या अहवालावर चर्चा करण्याची परवानगी देणार नाही. परंतु, सभागृहाची भावना लक्षात घेत त्यातील काही ठळक मुद्दे मांडण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार, उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत.
मुंबई महापालिकेच्या दोन विभागांची २० कामं ही कोणतंही टेंडर न काढता देण्यात आली. जवळपास २१४ कोटींची ही कामं आहेत ज्यासाठी टेंडर काढलं गेलं नाही. ४ हजार ७५५ कोटींची कामं ही कंत्राटदार, बीएमसी यांच्यात करारच झाला नाही. त्यामुळे महापालिकेला त्यांच्यावर कारवाईचा अधिकार उरला नाही. ३ हजार ३५७ कोटींच्या महापालिकेच्या १३ कामांना थर्ड पार्टी ऑडिटर नेमला गेला नाही. त्यामुळे ही कामं नेमकी कशी झाली आहे हे पाहण्याची यंत्रणा उपलब्ध नाही, असे कॅगच्या अहवालात नमूद असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अतिक्रमण असलेल्या जागेचे अधिग्रहण
दहीसरमध्ये ३२ हजार ३९४ चौरस मीटर जागा ज्यावर खेळाचे मैदान, बगीचा, मॅटर्निटी होम यासाठी ९३ च्या डीपीप्रमाणे राखीव होतं.डिसेंबर २०११ मध्ये महापालिकेने अधिग्रहणाचा ठराव केला आणि अंतिम जे मूल्यांकन केलं ते मूल्यांकन ३४९ कोटींचं केलं आहे. हे मूल्यांकन मूळ ठरवलं होतं त्यापेक्षा ७१६ टक्के जास्तीचं आहे. याच जागेसंदर्भातला धक्कादायक प्रकार हा आहे की जागेच्या अधिग्रहणासाठी पैसे दिलेत पण या जागेवर अतिक्रमण आहे. त्यामुळे या जागेचं पुनर्विकास करायचा असेल तर पुनर्वसनावरच ८० कोटी खर्च आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1639557593222852611?s=20
BMC Mumbai Municipal Corporation CAG Report