नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या लोकांचे विशेष अभिनंदन केले आहे. जगातल्या सर्वात स्वच्छ समुद्रकिनारे म्हणून गणना जाणाऱ्या ‘नील समुद्र किनारे’ यादीमध्ये येथील मिनीकॉय, थुंडी आणि कडमट या समुद्रकिनाऱ्यांना स्थान मिळाले आहे म्हणून पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या लोकांचे विशेष अभिनंदन केले. पंतप्रधानांनी भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण किनारपट्टीचा खास उल्लेख केला आणि किनाऱ्यांच्या स्वच्छतेबद्दल भारतीयांमध्ये निर्माण झालेल्या आवडीचे कौतुक केले. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या संदेश शेअर करत पंतप्रधानांनी खालील प्रमाणे ट्विट केले आहे, “हे फारच विशेष आहे ! अभिनंदन. विशेषतः लक्षद्वीपच्या नागरिकांचे या पराक्रमाबद्दल विशेष अभिनंदन. भारताची किनारपट्टी खास आहे आणि आता आपल्या लोकांमध्ये किनाऱ्याच्या स्वच्छतेबद्दल खूप आवड दिसून येत आहे.”
https://twitter.com/narendramodi/status/1585257555848495104?s=20&t=xWgs4u29VpKDHD3u4Nfdhw