निलेश गौतम, डांगसौंदाणे (सटाणा)
सातव्या आंतरराष्ट्रीय नेपाळ गेम्स हिरोस कप 2022 पोखरा येथे झाला. राष्ट्रीय युवकांच्या नेतृत्वाखाली आयोजित क्रीडा आणि शिक्षण महासंघ, नेपाळ यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेत ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांवर पदकांचा वर्षाव झाला. ब्लॉसमच्या विद्यार्थ्यांनी अनेक पदके जिंकून संस्थेचे आणि त्यांच्या पालकांचे नाव उंचावले. या स्पर्धेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात विजेते आहेत,
▪️ 17 वर्षाखालील ॲथलेटिक्स (१०० मीटर)
१) पियूष दत्तू बैताडे, सुवर्णपदक
२) पृथ्वी राजेंद्र सिंग परदेशी, रौप्यपदक
▪️ १४ वर्षाखालील ॲथलेटिक्स (१०० मीटर)
१) लौकिक शेखर मोरे, रौप्यपदक
▪️ १२ वर्षाखालील ॲथलेटिक्स(१०० मीटर)
१) नक्षत्र के पवार रौप्यपदक
▪️ १४ वर्षाखालील स्केटिंग
१) आर्यन महेश सोनवणे, सुवर्ण पदक
२) केतन सुनील आहेर, रौप्यपदक
▪️ १२ वर्षाखालील स्केटिंग
१) विराज बी सोनवणे, सुवर्णपदक
२) राणाराजवीर सपकाळ, सुवर्णपदक
३) यश कापडणीस, सुवर्णपदक
▪️८ वर्षाखालील स्केटिंग
१) विराट दुसाने, सुवर्णपदक
▪️१७ वर्षाखालील कराटे
१) कुणाल विजय बागुन, सुवर्णपदक
विद्यार्थ्यांचा गौरव करताना आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. शाळा व्यवस्थापन संघ, शाळेच्या संचालिका सौ. कल्पना पाटील , संचालक श्री. चेतन पाटील, मुख्याध्यापिका सौ. रुपाली सोनवणे आणि उपमुख्याध्यापिका सौ. प्रिती भामरे यांनी, संस्थेसाठी ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे सांगून या विजेत्यांचे कौतुक केले.
ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष श्री. पंडितराव त्र्यंबकराव पाटील म्हणाले की, प्रशिक्षक श्री जावेद शाह, श्री मोसीम शहा आणि सौ. कल्याणी परदेशी यांनी ही स्पर्धा जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला असून विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी परिश्रम घेतले. कोरोना नंतर विद्यार्थ्यांना भविष्यात कठोर परिश्रम करण्याची ही सर्वात मोठी प्रेरणा आहे.