विशेष प्रतिनिधी, नाशिक
शरीरातील रक्त हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तसेच, या रक्ताचा दाब सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. रक्तबाद कमी किंवा अधिक झाला तरी त्याचा मोठा परिणाम आपल्या शरीरातील रक्ताभिसरणावर होत असतो. रक्तदाब कमी-अधिक झाला तर त्याचा थेट परिणाम हृदयाच्या कामकाजावर होतो. म्हणूनच रक्तदाब योग्य आणि नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. मात्र, हा रक्तदाब नक्की किती असावा हे अनेकांना माहित नसते. त्याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
जर रक्तदाब १०० आणि ६० असेल तर तो कमी समजला जातो.
जर रक्तदाब १४० आणि ९० असेल तर तो सामान्य समजला जातो.
जर रक्तदाब १४० आणि ९० पेक्षा अधिक असेल तर तो जास्त समजला जातो.
जर रक्तदाब १५० आणि ९५ असेल तर तो खुप जास्त समजला जातो.