नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीत अनेक आजार वाढत आहेत त्यापैकीच एक मुख्य आजार म्हणजे रक्तदाब किंवा बीपी होय. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाययोजना सांगण्यात येतात त्यापैकी निरोगी व हेल्दी आहार हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करतो. ज्यांचा बीपी नेहमी वाढलेला असतो आणि ज्यांना दररोज औषध घेण्याशिवाय पर्याय नाही, त्यांनी आपल्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करावा. तसेच भरपूर पाणी प्यावे, असेही आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे जिथे धमनीच्या भिंतींवर रक्ताचा दबाव सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात होतो. भारतात दरवर्षी लाखो प्रकरणे समोर येतात. जेव्हा रक्तदाब 140/90 च्या वर असेल तेव्हा तो उच्च रक्तदाब मानला जातो आणि जेव्हा तो 180/90 पेक्षा जास्त असतो तेव्हा तो गंभीर मानला जातो. हायपरटेन्शनमध्ये सहसा कोणतीही लक्षणे नसतात, परंतु यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोक सारख्या घातक परिस्थितींचा धोका वाढू शकतो.
आहारतज्ज्ञ सुचवतात की, जीवनशैली आणि आहारात बदल करून उच्च रक्तदाबाची स्थिती नियंत्रित केली जाऊ शकते.आता अगदी कमी वयापासूनच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणे आवश्यक झाले आहे. रक्तदाब नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. औषधाव्यतिरिक्त त्यावर नियंत्रण ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकता.
जेवणासोबत जास्त मीठ खाल्ल्याने तुमच्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे उच्च रक्तदाब, स्ट्रोकसह इतर गंभीर हृदयरोग होऊ शकतात. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर जेवणात मिठाचे सेवन कमी करा. याशिवाय प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी ताजी फळे आपल्या आहारात घ्यावीत. तसेच सोडियमचे सेवन कमी केल्याने उच्च रक्तदाब ५ ते ६ मिमी HG कमी होऊ शकतो. दरम्यान सामान्य व्यक्तींनी एका दिवसात २,३०० मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या नागरिकांसाठी पोटॅशियम हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. हे खनिज अतिरिक्त सोडियमपासून मुक्त होण्यास मदत करते आणि रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी करते. हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, बटाटे, आणि रताळे, खरबूज, केळी, संत्री आणि जर्दाळू, दूध, दही, यांसारखे पोटॅशियम समृद्ध असलेले पदार्थ खावेत. रक्तदाबाची समस्या आता दिवसेंदिवस खूपच जास्त वाढते आहे. याला कारण अर्थातच आपली बदललेली जीवनशैली, जंकफूडचं वाढलेले प्रमाण, कामाचा- करिअरचा वाढलेला ताण. यासगळ्या गोष्टींचा परिणाम तब्येतीवर होतोच.
आजच्या काळात अनेकांना कमी वयातच रक्तदाबाचा त्रास जडला आहे. रक्तदाबाविषयी करण्यात आलेल्या काही अभ्यासानुसार भारतात ३० टक्के तरुणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. यामध्ये ग्रामीण भागातल्या तरुणाईचं प्रमाणही उल्लेखनीय आहे, हे विशेष. त्यामुळे आता अगदी कमी वयापासूनच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणे गरजेचे आहे. कारण उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला अधिक ताकद लावून रक्ताचं पंपिंग करावं लागणं. यामुळे रक्त गरजेपेक्षा जास्त वेगात रक्तवाहिन्यांमधून ढकलले जाते यामुळे किडनीचे विकार, हृदयविकार, हार्टअटॅक, स्ट्रोक येणं, डिमेंशिया, रक्तवाहिन्यांचे आजार असे अनेक आजार उद्भवतात.
इंग्लंडमधील तज्ज्ञांनी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी एक महत्त्वपुर्ण आणि प्रत्येकाला अगदी सहज शक्य होईल, असा उपाय सुचवला आहे. ते म्हणतात की रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मी माझ्या सगळ्याच रुग्णांना दिवसांतून ८ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देते. कारण शरीर डिटॉक्स करण्यासाठी म्हणजेच शुद्ध करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीरातलं अतिरिक्त सोडियम शरीराबाहेर टाकण्याची क्रिया सोपी होते. सोडियम हे रक्तदाब वाढविण्यासाठी जबाबदार असतं. त्यामुळे ते शरीराबाहेर पडल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरातून ८ ग्लास किंवा दोन ते अडीच लीटर पाणी प्रत्येक प्रौढ व्यक्तीने प्यायलाच पाहिजे.
Blood Pressure Daily Water Drinking Expert Says