अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरातील पूर्व भागात असलेल्या काही कत्तलखान्यातून रक्त मिश्रित पाणी नेहमी ड्रेनेज व्दारे मोसम नदी पत्रात सोडले जाते. मात्र ड्रेनेज चोकअप झाल्याने हे पाणी थेट सरदार चौकातून खाली येत सांडवा पूलावर आल्याने येथील व्यवसाईकांची चांगलीच अडचण झाली आहे. या पाण्यामुळे दुर्गंधी येत असल्याने या परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली. मनपा प्रशासनाला वारंवार या विषयी तक्रारी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मालेगाव संघर्ष समितीचे रामदास बोरसे यांनी सांगितले.