देवळा ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी आज नाशिकच्या देवळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा असताना दुसरीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. दरवाढ व्हावी यासाठी अगोदर आंदोलन करण्यात आले. मात्र शासन त्याकडे लक्ष देत नाही,लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रस्त्यावर उतरल्या शिवाय न्याय मिळणार नाही या भावनेतून शेतकरी संघटनेने देवळ्याती पाच कंदील येथे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. बाजार समिती जवळून निघालेल्या मोर्चात कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.