अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला शहर शिवसेनेतर्फे शिवसेनेच्या बंडखोर आमदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नगर- मनमाड हायवे वरील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोकोमुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. शिवसेनेशी गद्दारी खपवून घेतली जाणार नाही उध्दव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनात आमदार नरेंद्र दराडे, जयंत दिंडे, संभाजी पवार,रतन बोरणारे, राजाभाऊ लोणारी, चंद्रकांत शिंदे, चंद्रमोहन मोरे, कुणाल दराडे, भागीनाथ थोरात, वाल्मिक गोरे, महेश सरोदे, सतीश कायस्थ, राहुल लोणारी, दीपक भदाणे आदी सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.