विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनातून बरे झाल्यानंतर १४ तो १५ दिवसांनंतर म्युकरोमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी या आजाराचे रुग्ण वेगवेगळ्या भागात वाढू लागले आहेत. काही रुग्ण कोरोनाबाधित झाल्यानंतरही या आजाराची लक्षणे आढळलेली आहेत. शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना या आजाराचा अधिक धोका आहे. देशातील ११ राज्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे.
गुजरात
गुजरातमध्ये म्युकरोमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. परिस्थिती इतकी खराब झाली आहे की, राज्यामध्ये आता या आजाराचे वेग वॉर्ड बनविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत २०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. यापैकी अनेकांची डोळ्याची दृष्टी गेली आहे.
महाराष्ट्र
राज्यात गेल्या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर काळ्या बुरशी आजाराच्या संसर्गामुळे आतापर्यंत ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८ रुग्णांच्या डोळ्याची दृष्टी गेलेली आहे. वेगाने फैलावणार्या या आजारामुळे आरोग्य विभागासमोरील आव्हाने वाढली आहेत. या आजारामुळे मृत झालेल्या लोकांची आरोग्य विभागाने प्रथमच यादी बनविली आहे. त्यामध्ये हा आकडा समोर आला आहे.
हरियाणा
काळी बुरशी हा अधिसूचित आजार असल्याचे हरियाणा सरकारने जाहीर केले आहे. आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्विट करून ही माहिती दिली. हरियाणामध्ये काळ्या बुरशीचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांना योग्य उपचार मिळावे तसेच आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी नवे रुग्ण आढळल्यानंतर डॉक्टरांना महापालिका आयुक्तांना माहिती द्यावी लागणार आहे, असे विज यांनी ट्विटरवरून सांगितले.
दिल्ली
दिल्लीमध्ये काळ्या बुरशीचे आतापर्यंत एकूण १६० रुग्ण आढळले असून, एम्समध्ये २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे आरोग्य अधिकार्यांनी सांगितले.
बिहार
बिहारमध्ये काळ्या बुरशीचे २९ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ८ रुग्ण पाटणा येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहेत. इतर रुग्णांचे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
ओदिशा
ओदिशामध्ये सोमवारी (१० मे) रोजी काळ्या बुरशीचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर राज्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत गेली. राज्य सरकारने काळ्या बुरशीच्या रुग्णांवर देखरेखीसाठी सात सदस्यीय राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे.
तेलंगणा
हैदराबादमध्ये काळ्या बुरशीचे जवळपास ६० रुग्ण आढळले आहेत. जुबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात गेल्या एका महिन्यात ५० रुग्ण आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कर्नाटक
कर्नाटकमध्येसुद्धा म्युकरोमा यकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. बंगळुरूमध्ये गेल्या दोन आठवड्यात या आजाराचे ३८ रुग्ण आढळले आहेत. काळ्या बुरशीच्या रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
राजस्थान
राजस्थानमध्ये काळ्या बुरशीच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. जयपूर येथे १४ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. अनेक रुग्णांना आपल्या डोळ्याची दृष्टी गमवावी लागली आहे.
मध्यप्रदेश
मध्यप्रदेशमध्ये म्युकरोमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. या आजारामुळे आतापर्यंत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात या आजाराचे ५० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यातील डॉक्टर परदेशातील डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत.
केरळ