नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय स्वातंत्र्य दिन व भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त, बीजेएसच्या नाशिक येथील द्वारका शाखेतर्फे आश्रय वृद्धाश्रमात येथे रुग्णोउपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. त्याचप्रमाणे या भावनिक कार्यक्रमात शिधा व फळ वाटपाचा कार्यक्रमही झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी फाऊलर सर्जिकल कॅाट, किराणा सामान आणि फळांचे वाटप करण्यात आले. श्रीमती सुशीलाजी बरडिया, निलेश आणि कमलेश बरडिया यांनी यासाठी सर्व आर्थिक सहकार्य केले.
या छोटेखानी सोहळयात सर्वांनी रुग्णांशी संवाद साधला. त्यांनीही यावेळी सर्व आठवणी सांगत आपले मन मोकळे केले. आश्रय वृद्धाश्रमाचे चंद्रशेखर कुलकर्णी यांनी आश्रमाची माहिती दिली. तब्बल ६५ रुग्ण याठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले. तर व्दारका शाखेचे संतोष संकलेचा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन कसे करण्यात आले याविषयीच माहिती दिली. पत्रकार गौतम संचेती यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत बरडीया परिवाराचे व संघटनेचे आभार व्यक्त केले. तर बीजेएसचे राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांनी संघटनेच्या कामांची व उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी बीजेएसचे राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य सचिव ललित सुराणा, व्दराका शाखेचे संतोष संकलेचा, पत्रकार गौतम संचेती, नितीन खिंवसरा, मनीष शाह, मोहनलाल संचेती, संजय छाजेड, प्रशांत छाजेड इत्यादी उपस्थित होते.