मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. शिंदे गट आणि भाजपाचे सरकार म्हणजे खरी व नैसर्गिक युती असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे. असे असताना आता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपा नेते निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी एकमेकांची लायकी काढली आहे.
भाजपाच्या कोणत्याही नेत्याने उद्धव ठाकरे किंवा मातोश्री विरोधात टीका करू नये, ती आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतली होती. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आली होती. असे असताना देखील भाजपा नेते निलेश राणे हे सातत्याने ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका करत होते. यावरून आता निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अजूनही शाब्दिक चकमक सुरू आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी केसरकरांची लायकी काढल्यानंतर केसरकर यांनीही निलेश राणे यांची लायकी काढली आहे.
निलेश राणे ठाकरे घराण्यावरची टीका बंद करावीत, असे दीपक केसरकर यांनी म्हटले होते. यावर निलेश राणे यांनी केसरकर २५ दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरु नका, असे म्हणत त्यांना थेट इशार दिला आहे. त्यावर आत केसरकर यांनी निलेश राणे यांची लायकीच काढली आहे. नारायण राणे यांची मुले लहान आहेत, देवेंद्र फडणवीस यांना सांगून आम्ही त्यांनाही समजावू असे केसकर म्हणाले होते.
दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याला निलेश राणे यांनीही ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ‘दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. असा इशारा निलेश राणे यांना दिला होता. आता दीपक केसरकर यांनी पुन्हा पलटवार केला आहे. त्यांनी दहा वेळा ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली तर मी दहा वेळा बोलणार. असे सांगत केसरकर यांनी राणे यांना कोकणी जनतेने निलेश राणेंची यापूर्वीच लायकी दाखवली, अशी बोचरी टीकाही केली.
भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकीचे आयोजन केलं होत. या बैठकीला शिंदे गटालाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे शिंदे गटाचे प्रतिनिधी म्हणून दीपक केसरकर या बैठकीसाठी दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निलेश राणेंच्या टीकेचा समाचार घेतला. तसेच आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक पवारांच्या पालखीचे भोई कधीच होणार नाहीत. आमची एकी कधीही फुटणार नाही. शिवसेना हा महाराष्ट्राचा कणा आहे अभिमान आहे तो टिकला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
BJP Vs Shinde group Allegation Leaders Politics