नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करुन भाजपने उद्धव ठाकरेंवर चांलगाच निशाणा साधला. शिवसेनेतील अंतर्गत फाटाफूट ही सेना कमजोर होण्यात आणि उद्धव यांचे महत्त्व कमी करण्यात यश आले आहे. त्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना घेरण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी भाजपने ठोस रणनिती आखली आहे.
शरद पवारांवर नेम धरुन भाजपने एक खेळी खळण्याचे निश्चित केले आहे. त्या सुरुवात त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघातून होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आधीच तयारी सुरू केली आहे आणि त्यासाठी १६ जागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ज्या जागा विरोधकांनी अनेकदा जिंकल्या आहेत. यापैकी एक जागा बारामतीची आहे, जिथून सुप्रिया सुळे खासदार आहेत. या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला घेरण्यासाठी भाजपने ‘मिशन बारामती’ची तयारी केली आहे. यासाठी निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठीच भाजपला तेथे मजबूत करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामतीची जागा पवार कुटुंबियांसाठी सुरक्षित मानली जात आहे. अशा स्थितीत भाजपची तयारी शरद पवारांवरील ताण वाढवणार आहे. निर्मला सीतारामन या १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान बारामती दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान त्या भाजप कार्यकर्त्यांना भेटून पक्षाच्या ताकदीचा आढावा घेणार आहेत. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरद पवार कुटुंबीय या जागेवरून विजयी होत आहेत. खुद्द शरद पवारही येथून खासदार राहिले आहेत. अशा स्थितीत भाजपची रणनिती पवारांना किती वेदना देऊ शकते हे स्पष्ट झाले आहे. भाजपने महाराष्ट्रात अशा १६ जागा निवडल्या आहेत, जिथे सातत्याने विरोधक जिंकत आहेत. या जागांवर आपले संघटन मजबूत करून भाजपला २०२४ मध्ये विजय प्राप्त करायचा आहे.
भाजपने देशभरात एकूण १४४ जागा निवडल्या आहेत, त्यापैकी १६ महाराष्ट्रातील आहेत. एकीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीला भेट देणार आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांच्याकडे शिरूर लोकसभेची कमान सोपवण्यात आली आहे. येथूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. पुणे जिल्ह्यात लोकसभेच्या ४ जागा असून, त्यापैकी फक्त एक जागा भाजपच्या ताब्यात आहे, ती शहरी भागातील आहे. याशिवाय बारामती आणि शिरूर लोकसभेच्या जागा राष्ट्रवादीकडे आहेत. दुसरीकडे २०१९ मध्ये मावळ मतदारसंघातून शिवसेनेचा विजय झाला होता. शिवसेनेचे श्रीरंग बारणे येथून खासदार आहेत. भाजपचा आणखी एक फायदा म्हणजे श्रीरंग आता एकनाथ शिंदेंच्या छावणीत आहे.
बारामती हे ‘ब्रँड पवार’ म्हणून ओळखले जाते आणि सर्व प्रयत्न करूनही भाजपला जम बसवता आलेला नाही. पण महाराष्ट्रात उद्धव सरकार निघून गेल्याने आणि विरोधी छावणीची एकजूट कमकुवत झाल्याचा फायदा भाजपला घ्यायचा आहे. बारामतीच्या विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे पुतणे अजित पवार विजयी झाले आहेत. २०१९ मध्ये सुप्रिया सुळे भाजपच्या उमेदवाराविरोधात दीड लाख मतांनी विजयी झाल्या होत्या. आता मिशन बारामतीद्वारे भाजपने मोठा निशाणा साधण्याचे निश्चित केले आहे.
BJP Strategy for NCP Chef Sharad Pawar Politics
Mission Baramati Loksabha Election 2024