मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांची आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून सभा, अधिवशनावर भर दिला जात आहे. अलिकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थित औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली होती. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर आता नाशिकमध्ये भाजपच्या प्रदेश पदाधिकारी बैठकीला प्रारंभ झाला आहे.
कालपासून नाशिकमध्ये या बैठकीला प्रारंभ झाला आहे. राज्यातील पदाधिकाऱ्यांसह कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. २०२४ च्या निवडणुकीची पूर्वतयारी भाजपकडून केली जात आहे. या निवडणुकीत भाजपच्या वतिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर निवडणुका भाजप लढवणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचा प्रचार कायम ठेवण्यासाठी भाजपकडून जाहीर सभा घेतल्या जात आहेत.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1624081851924246529?s=20&t=VRFhz_-KlXNjP8Zf7RmULQ
देशभरातच आयोजन
२०२४ च्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करून भाजपने संपूर्ण देशभरातच जाहीर सभा, पक्षीय अधिवेशन, कोअर कमिटीच्या बैठका आयोजित करण्यावर भर दिला आहे. त्याद्वारे स्थानिक नेते कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, पक्षाची धोरणे, कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सोपविणे हा त्यामागील हेतू आहे. त्याचवेळी जाहीर सभांच्या माध्यमातून जनतेवर पक्षाची छाप कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
https://twitter.com/cbawankule/status/1624249543775899648?s=20&t=VRFhz_-KlXNjP8Zf7RmULQ
हे मान्यवर नाशकात
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर, विनोद तावडे, सी टी रवी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, डॉ. भारती पवार, कपिल पाटील, माजी राज्यपाल राम नाईक, राज्यातील भाजपचे सर्व मंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित आहेत.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1624099159379972101?s=20&t=VRFhz_-KlXNjP8Zf7RmULQ
जोरदार तयारी
नाशिकमध्ये आयोजित या बैठकीत राज्यपभरातील पदाधिकारी आणि उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह हे उपस्थित राहणार होते. पण, त्यांचा दौरा रद्द झाला. शेकडो पदाधिकारी आणि कोअर कमिटीचे पदाधिकारी या राज्य अधिवेशनाला सहभागी झाले आहेत. अधिवेशनासह सभा यशस्वी करण्यासाठी भाजपतर्फे अनेक मंत्री आणि पदाधिकारी नाशिकमध्ये ये-जा करीत आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अधिवेशन यशस्वी करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन लक्ष देऊन होते.
https://twitter.com/cbawankule/status/1624249555490574337?s=20&t=VRFhz_-KlXNjP8Zf7RmULQ
BJP State Office Bearers Meeting Started in Nashik
Politics