शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले…

नोव्हेंबर 22, 2022 | 4:59 pm
in राज्य
0
Chandrashekhar Bawankule1 1

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीचे १८ कोटी कोट्यवधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात व शिवरायांचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.

त्यांनी सांगितले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वयाच्या ७९ व्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून गेले. पदवीदान समारंभात जे वक्तव्य झाले त्याचे कोणी समर्थन करत नाही. परंतु, केवळ एखाद्या विधानावरून त्यांना कोंडीत पकडू नये.

ते म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत लाजीरवाण्या शब्दात टीका केली त्याची संपूर्ण महाराष्ट्राने निंदा केली. पण आदित्य ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. मा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हिंदुत्व, शिवाजी महाराज, सावरकर या विषयांची काळजी असते तर अशी गळाभेट घेतली नसती.

खा. संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पडेल असे भाकित केले त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सरकार मजबूत आहे, ते कार्यकाळ पूर्ण करेल. विरोधी पक्षांपैकी वीस ते पंचवीस आमदारांचे या सरकारला छुपे समर्थन आहे. सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितले तर सध्याच्या १६४ पेक्षा खूप जास्त आमदारांचे समर्थन दिसेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात असताना काँग्रेसच्या पाचशे सक्रीय व स्थानिक पातळीवरील प्रभावी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आमच्याबद्दल बोलण्यापेक्षा आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या तीन पक्षांना उमेदवार तरी मिळतात का पहावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आल्याच्या वृत्ताविषयी विचारले असता मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही. केंद्रात मा. अमित शाह गृहमंत्री आहेत तर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार सक्षम आहे. धमकी देणाऱ्यांना शोधून कारवाई केली जाईल.

BJP State Chief on Governor Shivaji Maharaj Statement
Chandrashekhar Bawankule

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रद्धा हत्याकांड : अखेर आफताबने कोर्टात कबूल केला गुन्हा; न्यायाधीशांना म्हणाला….

Next Post

‘पासपोर्ट’च्या धर्तीवर ‘जात वैधता प्रमाणपत्र’ देणारा हा ठरला राज्यातील पहिला जिल्हा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20221122 WA0016

‘पासपोर्ट’च्या धर्तीवर ‘जात वैधता प्रमाणपत्र’ देणारा हा ठरला राज्यातील पहिला जिल्हा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011