नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने कडाडून विरोध केला आहे. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले आहे. त्यामुळे ही बाब देशासाठी गौरवाची नाही. आणि अशा व्यक्तीचे नाव मैदानाला देणे अयोग्य आहे. ही बाब आम्ही कदापिही खपवून घेतली जाणार नाही. हा निर्णय त्वरीत रद्द केला पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1486229351373099014?s=20