मुंबई – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर भाजपने झेंडा अंथरुन अभिवादन केले. यावरुन सोशल मिडियात भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपने पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळल्याचे यानिमित्ताने टीकास्त्र सोडले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही याप्रकरणाची दखल घेतली आहे. राष्ट्रवादीने म्हटले आहे की, “आधी देश, मग पक्ष, शेवटी स्वतः”अशी घोषणा देणाऱ्या भाजपने देशाला आता पक्षाच्या झेंड्याखाली गुंडाळून ठेवलं. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या निधनानंतर त्यांना अभिवादन करत असताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी चक्क भारताच्या ध्वजावर भाजपचा झेंडा अंथरला, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. नेटकऱ्यांनी भाजपला यावरुन चांगलेच ट्रोल केले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1429391991087853571