मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. त्यांनी मोठे मताधिक्य मिळविले आहे. ही निवडणूक संपूर्ण राज्यातच विशेष चर्चेची ठरली. या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. निकालानंतर भाजपची प्रतिक्रीया काय असणार याचीही मोठी उत्सुकता होती.
आशिष शेलार यांनी ट्विट करुन प्रतिक्रीया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या मदतीमुळे मा. ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय..ऋतुजाताईंचे अभिनंदन!! काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप डझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता!
https://twitter.com/ShelarAshish/status/1589175246481129473?s=20&t=QrneK4w6WB89auMmZygCiQ
BJP Reaction After Andheri By Poll Election Result