नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने (भाजप) संसदीय समिती व केंद्रीय निवडणूक समितीची यादी आज जाहीर केली आहे. त्यात संसदीय समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव वगळले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली आहे. गडकरी बरोबरच संसदीय समितीतून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही वगळण्यात आले आहे.भाजपच्या संघटनात्मक पातळीवरच्या महत्वाच्या या महत्त्वाच्या नेमणुका आहे. त्यात गडकरी यांना वगळतांना संसदीय समितीत मात्र महाराष्ट्रातील एकाही नेत्याला संधी देण्यात आलेले नाही.
भाजपची संसदीय समिती अशी
भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना संधी देण्यात आली आहे. तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना वगळण्यात आले आहे. संसदीय समितीत आता अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, येडीयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, श्री के लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बी एल संतोष या ११ जणांचा समावेश आहे. भाजपच्या या संसदीय समितीत महाराष्ट्रातील एकही नेता नाही.
भाजपची केंद्रीय निवडणूक समिती अशी
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, बी. एस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, भूपेंद्र यादव
देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बी.एल.संतोष (सचिव), वनथी श्रीनिवास (पदसिद्ध) यांचा समावेश आहे.
BJP Politics Central Team Devendra Fadanvis Nitin Gadkari