मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळाची गंभीर दखल भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे पक्ष नेतृत्वावर नाराज असून त्यांनी जवळपास १० आमदारांसोबत सूरत गाठले आहे. सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये ते असल्याचे सांगितले जाते. जर शिंदेंनी बंडखोरी केली तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची चिन्हे आहेत. राज्यातील राजकारणात होत असलेल्या या बदलांची दखल घेत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने त्यांच्या जोरदार हालचाली असल्याचे सांगितले जात आहे. आज दुपारी किंवा सायंकाळी फडणवीस यांची पत्रकार परिषद दिल्लीत होण्याची चिन्हे आहेत. त्यात सर्व काही खुलासा होईल, असे बोलले जात आहे.
bjp opposition leader devendra fadanvis delhi tour