इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उध्दव ठाकरे सोबत असते तर आज जेवढे बहुमत मिळाले आहे, त्यापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते असे विधान भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. ते पुढे म्हणाले की, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली नसती तर २०१४ ते २०१९ या काळात जसं सरकार चालवले गेले तसेच ते आताही सुरु असते. या कारभाराच्या जोरावर आम्हाला याहून देखील अधिक जागा मिळाल्या असत्या असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर बोलतांना दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदे बिलकुल नाराज नाहीत. केवळ वर्तमानपत्र आणि चॅनलला चाललेली ही बातमी आहे. ते स्वत.च्या गावी गेले आहेत. यात शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की पाच ताऱखेला मुख्यमंत्र्याचा शपथविधी आहे. आधी विधीमंडळ पक्षाची बैठक होईल, नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. जसं ठरलं तसं सुरु आहे.
यावेळी त्यांनी कोणताही वाद आमच्यामध्ये नाही. मुख्यमंत्रिपद कोणाला हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मात्र मुख्यमंत्री कोण हे आमचं ठरलं आहे. मात्र जोपर्यंत वरिष्ठांची सही होत नाही. तोवर अधिकृतरित्या नाव जाहीर केले जात नाही. असा आमच्या पार्टीचा विषय आहे. जोवर वरिष्ठांचा शिक्का बसत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदी कोण याबाबत कुठलीही घोषणा होणार नाही असे दानवे यांनी सांगितले.