मुंबई ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा शिंदे गट लढवणार अशी चर्चा होती. पण, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे या मतदार संघाता शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना रंगणार आहे.
सायंकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप नेते आशिष शेलार यांच्यात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय मुरजी पटेल यांना सांगण्यात आला. आता दोन्ही पक्षाचे उमेदवार निश्चित झाल्यामुळे अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी शुक्रवारी दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. ही लढत महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशी होणार असल्यामुळे त्यात शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली. त्यावेळेस त्यांना ४५ हजार ८०८ मते मिळाली होती. तर रमेश लटके यांना ६२ हजार ७७३ मते मिळाली होती.