मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी-सूचना जाणून घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमाची उद्या, गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी ‘एन वॉर्ड’ मधून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
गुरुवार दि. ०६/१०/२०२२ रोजी एन वॉर्ड, शुक्रवार दि.०७/१०/२०२२ रोजी आर साऊथ वॉर्ड येथे, शनिवार दि.०८/१०/२०२२ रोजी के ईस्ट वॉर्ड, सोमवार दि.१०/१०/२०२२ रोजी आर सेंट्रल वॉर्ड, बुधवार दि.१२/१०/२०२२ रोजी एल वॉर्ड, गुरुवार दि. १३/१०/२०२२ रोजी एस वॉर्ड, शुक्रवार दि.१४/१०/२०२२ रोजी एम ईस्ट वॉर्ड, शनिवार दि.१५/१०/२०२२ एच वेस्ट वॉर्ड, सोमवार दि.१७/१०/२०२२ रोजी आर नॉर्थ वॉर्ड येथे, बुधवार, दि.१९/१०/२०२२ रोजी पी नॉर्थ वॉर्ड येथे, गुरुवार दि.२०/१०/२०२२ रोजी पी साऊथ वॉर्ड येथे, सोमवार दि.३१/१०/२०२२ रोजी एम वेस्ट वॉर्ड येथे, बुधवार दि.०२/११/२०२२ रोजी के वेस्ट वॉर्ड येथे, गुरुवार दि.०३/११/२०२२ रोजी एच ईस्ट वॉर्ड येथे, शुक्रवार दि.४/११/२०२२ रोजी टी वॉर्ड येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. नियोजित दिवशी सकाळी १० वाजता मुंबई उपनगर जिल्ह्यात हा उपक्रम वरील प्रमाणे सुरू होणार आहे.
यावेळी नागरिकांना आपल्या समस्या पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून सांगता येतील व ती समस्या सोडवण्यासाठी अर्ज ही देता येणार आहे. अर्जामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. थेट बाधित व्यक्ती अथवा समूहाकरिता / Directly Affected Person or Group, अर्जदाराचे नाव / Name :,मोबाईल क्रमांक / Mobile No., संपूर्ण पत्ता / Full Address :, ई-मेल आयडी / Email Id :, लोकसभा क्षेत्र / Loksabha Area, विधानसभा क्षेत्रसभा / Assembly Area, बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड / BMC Ward, निवडणूक वॉर्ड क्रमांक / Election Ward No, तक्रार – समस्या विभाग / Complaint Department : 17 A) जिल्हाधिकारी B) तहसीलदार C) बृहन्मुंबई महानगरपालिका D) पोलिस E) रेल्वे)आरोग्य G) SRAH) म्हाडा 1) स्वच्छता ) रेशनिंग K) महानगर गॅस L) अन्य लेखी समस्या / तक्रार नागरिकांना सविस्तरपणे देता येईल.
तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. यासाठी वरील नमुन्यांमध्ये अर्ज देखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त ज्या नागरिकांच्या इतर काही लेखी समस्या असतील. त्याचे देखील निवेदन देता येईल, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
BJP Mumbai BMC Election Preparation
Guardian Minister Politics